एमजी मोटर इंडियाची टाटा पॉवरसह हात मिळवणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ टाटा पॉवर एमजी डीलरशिप्सवर सुपरफास्ट चार्जर्स लावणार ~


 


मुंबई, ८ जून २०२०: भारतातील ईलेक्ट्रिक वाहन क्रांतीच्या पुढील टप्प्याची सुरुवात करताना एमजी मोटर इंडियाने आज भारतातील सर्वात मोठ्या एकिकृत पॉवर युटिलिटी टाटा पॉवरशी सामंजस्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी केली. या भागीदारीचा एक भाग म्हणून टाटा पॉवरद्वारे काही निवडक एमजी डीलरशिप स्थानकांवर ५० किलोवॉट डीसी सुपरफास्ट चार्जर्स लावण्यात येतील. तसेच देशभरातील एमजी डीलरशिपसाठी एंड टू एंड ईव्ही चार्जिंग समाधान प्रदान करण्यात येईल.


 


या भागीदारीद्वारे भविष्यातील ईव्ही विस्तार योजनांचा एक भाग म्हणून प्रमुख लक्ष्यित शहरांवर लक्ष केंद्रीत करण्याचा एमजी मोटरचा उद्देश आहे. हा सुपरफास्ट ५० किलोवॉट डीसी चार्जर एमजी झेड एस ईव्ही ग्राहकांसह इतर ईव्ही मालक, ज्यांचे वाहने सीसीएस/सीएचएडेएमओ चार्जिंग स्टँडर्ड्सच्या अनुकूल आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध असतील.


 


एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, 'भारताशी आमच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी देताना आम्ही आमच्या ग्राहकांना क्लीनर आणि ग्रीन मोबिलिटी सोल्यूशन्स वापरण्यासाठी मजबूत चार्जिंग इकोसिस्टिम प्रदान करू इच्छितो. टाटा पॉवर, जो ऊर्जा क्षेत्रात एक प्रमुख आहे, त्याच्याशी भागीदारी करताना आमच्या उत्कृष्ट संबंध जपले जातील याची आम्हाला खात्री आहे.'


 


टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे सीईओ आणि एमडी श्री प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘एमजी मोटर एंडियाबरोबर एंड टू एंड चार्जिंग पार्टनर म्हणून काम करण्यात आम्हाला आनंद होत आहे. भविष्यात बॅटरीचा दुस-यांदा वापर करण्यासाठीही आम्ही काम करत आहोत. ईव्ही चार्जिंग स्पेसमधील भारतातील एकात्मिक अग्रेसर कंपनी . या भागीदारीतून आपल्या देशाची वाहनांतील इलेक्ट्रिफाइड रेंज, जी एमजी मोटर्स सादर करत आहे, ती वापरण्याची क्षमता वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.'


 


एमजी मोटर इंडियाने आधीच पाच शहरे- नवी दिल्ली-एनसीआर, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये एकूण १० सुपरफास्ट ५० किलोवॉट चार्जिंग स्टेशन स्थापन केले आहेत. आता आणखी नव्या शहरांमध्ये हा विस्तार करायचा आहे. दुसरीकडे टाटा पॉवरने ईएज चार्ज ब्रँड अंतर्गत १९ विविध शहरांमध्ये १८०+ चार्जिंग पॉइंटसह ईव्ही चार्जिंग इकोसिस्टिम स्थापन केले आहेत. ते डिजिटल प्लॅटफॉर्मसह उपलब्ध असून ग्राहकांना सहज व सुलभ अनुभव प्रदान करण्यासाठी उपलब्ध आहेत. एमजी-टाटा पॉवर भागीदारीत ग्राहक केंद्रीत दृष्टीकोनानुसार, प्रमुख मूल्ये आणि ऑपरेटिंग मॉडेल यांचा समावेश असेल. यात सेकंड लाइफ ईव्ही बॅटरीजचे व्यवस्थापनही समाविष्ट असण्याची शक्यता आहे.