पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे कॅम्प भागातील कोहिनुर हॉटेल येथे सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबतची मागणी
शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांना दिले निवेदन
पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोड येथील कोहिनुर हॉटेल येथे सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबतची मागणी शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .
आज करोनामुळे सर्व जण त्रस्त झाले असून पुणे कॅम्प भागात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे . महात्मा गांधी रोडवरील कोहिनुर हॉटेल येथे सर्रासपणे सोशल डिस्टंसिंगचा धुव्वा उडत आहे . त्याचप्रमाणे हॉटेलसाठी टेक अवे वे ची परमिशन दिलेली असताना तिथे कपामध्ये चहा दिला जातो . त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूला कमीत कमी ५० ते ६० लोक वेगवेगळ्या वाहनांवरती गर्दी करून चहा पीत बसलेले असतात . ते पिलेल्या चहाचे कप इतरत्र रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी होते . या दुर्गंधीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवतो . त्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने याकडे लक्ष देउन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे .
हे निवेदन शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख दिलीपराव तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे , पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे उपविभागप्रमुख अभय वाघमारे यांच्या नेर्तृत्वाखाली देण्यात आले . यावेळी शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विभागप्रमुख राजेंद्र शहा , उपविभागप्रमुख अजय परदेशी , शाखाप्रमुख राजेश पुरम , शाखाप्रमुख अजय भांबुरे , धनंजय नागवडे , योगेश होळकर , किरण कांबळे , मनोज घाटे , सुरज पहिलवान , सुरज लोखंडे, मोहन यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते .
सोबत - शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्याकडे निवेदन प्रत जोडली आहे .