उद्योजक नंदलाल ठक्कर यांच्या कडून भोई समाजाला किराणा सामान वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


      कर्जत दि . गणेश पवार


 


                                                                                       कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉकडाऊन परिस्थिती असताना इसांबे पंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना उद्योजक नंदलाल ठक्कर यांनी जीवनावश्यक सामानाचे वाटप करून मदतीचा हात दिला. 


 


        इसांबे हद्दीत व रसायनी पाताळगंगा विभागातही शासनाच्या या वाढिव लॉक डाउन ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु हातावर पोट भरणारे, मासेमारी करणारे भोई समाजाचे धंदे बंद असल्यामुळे रोजंदारी व मासेमारी करणारा तसेच दुसऱ्याच्या शेतात काम करून गुजराण करणारा भोई बांधवावर घरातच बसण्याची वेळ आली होती. 


 


       रोजगार नसल्याने घरात असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत वानीवली गावातील भोई बांधव होते. याबाबत इसांबे ग्रामपंचायतीचे सदस्य मधुकर शृंगारे यांनी मुलुंड येथील उद्योजक नंदलाल ठक्कर यांना सांगितले. ग्रामपंचायत सदस्य मधुकर शृंगारे यांच्या विनंतीला मान देऊन ठक्कर यांनी तात्काळ वानीवली गावातील हातावर पोट भरणारे गरजू गरीब भोई समाजाला जीवनावश्यक सामान दिले. वानीवलीगाव येथील भोई कुटुंबांना घरोघरी जाऊन तांदूळ, तेल, डाळ असे वाटप केले व आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची आवाहन केले. याबद्दल आदिवासी बांधवांनी नंदलाल ठक्कर यांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सद्स्य मधुकर शृंगारे व मारुती पाटील, भगवान पवार, सोपान पवार, शांताराम तारू राम मुसळे, धनाजी पवार, प्रकाश थोरवे, दिनेश पवार अनिल पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते 


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)