केंद्र सरकारने कोरोना संक्रमित होऊन मृत लोकांच्या परिवारास आर्थिक मदत जाहीर करावी:-सोमनाथ लोहार*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*केंद्र सरकारने कोरोना संक्रमित होऊन मृत लोकांच्या परिवारास आर्थिक मदत जाहीर करावी:-सोमनाथ लोहार*


 


करमाळा:-केंद्र सरकारने कोरोना संक्रमित होऊन मृत लोकांचा परिवारास आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्यतीतील प्रमुख दावेदार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे विद्यापीठ अध्यक्ष सोमनाथ लोहार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.


  पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की,सध्या देशात कोरोना या जिवाणूने घातलेला थैमान पाहता यामध्ये काही ना काही प्रमाणात


केंद्र सरकारच्या प्रशासनाचे अपयश असलाचे आपणांस मान्यच करावे लागेल.त्याला अनुसरन या दरम्यानच्या काळात


कोरोना जिवाणूच्या संसर्गामुळे ज्या मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराची दिलिगिरी व्यक्त करुन आर्थिक मदत करणं केंद्र सरकारची जबाबदारी आहे.तरी केंद्र सरकार ही जबाबदारी स्वीकारून कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या परिवारास आर्थिक मदत जाहीर करून वितरीत कराल ही अशी विनंती करण्यात आली आहे.या पत्राच्या प्रति खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष,नेते अभिषेक बोके याना पाठवण्यात आल्या आहेत