पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सीए स्थापना दिवसानिमित्त
' शिबिर
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. २८ जून, १, ३ व ४ जुलै या चार दिवशी शहराच्या विविध भागात हे रक्तदान शिबीर होणार आहे.
येत्या रविवारी (दि. २८ जून) फडके संकुल, टिळक रोड व आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे १० ते ५ या वेळेत, तर डीएमकेएच, फॉरचुन हाऊस, बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथे ९.३० ते ४.३० या वेळेत हे शिबीर होईल. बुधवारी (१ जुलै) एसपीसीएम, सेंट्रल पॉईंट, मित्र मंडळ, पर्वती येथे १०.३० ते १ या वेळेत, इंटरलिंक कॅपिटल अड्वायझर्स, केके मार्केट, पुणे सातारा रस्ता येथे ११ ते ५ या वेळेत, राठी अँड राठी कंपनी, कमल कीर्ती, सिंहगड रस्ता, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ ९ ते २ या वेळेत, तर एसएनजे अँड कंपनी, एरंडवना येथे ९ ते ५ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
कोरोनामुळे सध्या अनेक रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांत रक्तदान शिबिरे झालेली नाहीत. ही गरज लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे सीए स्थापना दिवसानिमित्त हे भव्य शिबीर आयोजिले आहे. शहराच्या विविध भागात होत असलेल्या या शिबिरांमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. अधिक माहितीकरिता www.puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन 'आयसीएआय' पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी केले आहे.