तीन महिन्यातील वीजबिल पूर्णपणे माफ करण्यात यावे व माफ झालेच पाहिजे,अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे

 


प्रति,


मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब


मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.


द्वारा:- मा.जिल्हाधिकारी,सातारा


 


यांस..


 


मा.महोदय,


छावा क्रांतीवीर सेनेचे संथापक अध्यक्ष


करण गायकर व केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली..


मी सागर भारत साळुंखे छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आपणास निवेदन असे की,


राज्यात 22 मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना लॉकडॉऊन नंतर घरगुती ग्राहकांचे विद्युत बिल देण्यात आलेले नाही आणि आता तीन महिन्यानंतर एकदम विद्युत वीजबिल देण्यात येईल अशी माहिती आहे.


लोकांना तीन महिने झाले काम-धंदा नाही,जे लोक भाड्याने राहतात त्यांना भाडे भरावे लागत आहे.तसेच गरीब मध्यम वर्गीय कुटुंबाला अशक्य होईल आणि पुन्हा अंधारात राहावे लागणार काय अशी भीती वर्तवली जात आहे.त्यामुळे वीजबिल भरणे गरीब कुटुंबियांसमोर फार मोठे संकट ठरणार आहे.त्यामुळे या तीन महिन्यातील वीजबिल पूर्णपणे माफ करण्यात यावे व माफ झालेच पाहिजे,अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने मी सागर भारत साळुंखे, रोहित पंडित सुतार,विशाल डोंगरे,अक्षय खाडे, कृष्णत तुपे,सुजित लादे,सिद्राम कसकी,अजिंक्य कांबळे,सागर शिंदे आम्ही करीत आहोत.


कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मोलमजुरी करणारे कामगार,छोटे मोठे उद्दोग धंदेवाले,अस्थाई कामगार, शेतकरी, शेतमजूर यांनी कठीण काळामध्ये उदरनिर्वाह चालविला आहे.आता थोड्या प्रमाणात कामे सुरू झालेली असली तरी अद्यापही अनेकांना उत्पनाचे साधन प्राप्त झालेले नाही.यावेळी महिन्याचे एकत्रित वीजबिल आल्यानंतर या बिलापोटी भरणा करणे या कुटुंबाला शक्य होणार नाही आणि वीज खंडित करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.याकरिता महाराष्ट्र शासनास आमची विनंती की,या कोरोना संक्रमण काळात अडचणीत आलेल्या सर्वसामान्य, गोर गरीब जनतेचे लाईट बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे व लाईट बिल पूर्णपणे माफ झालेच पाहिजे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आम्ही देत आहोत.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image