फडणवीसांच्या जीवावर पोपटासारखे बोलणाऱ्या पडळकर यांनी स्वतःची लायकी तपासून टीका करावी..... संजोग वाघेरे पाटील यांचे टीकास्त्र

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


ज्यांचा गळ्यात पट्टा घातलाय त्यांना बाप काय असतो ते समजले, त्यामुळे पडळकरांनी टीका करताना स्वतःची लायकी तपासावी  :


 


पिंपरी २४ जून धनगर समाजाच्या आरक्षणावरून भाजपने आमच्या बापाचा अपमान केला म्हणत लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना वंचित आघाडीतून वंचित रहावे लागले.  त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ज्याच्या हातून गळ्यात पट्टा घालून अजित दादांंसमोर दंड थोपटले, त्याहीवेळी बारामतीकरांनी त्यांना त्याची लायकी दाखवली. तर पवार साहेबांचं राजकारण संपलं अशा म्हणणाऱ्या फडणवीस यांनाही पवारसाहेब बापमाणूस आहेत, याचा साक्षात्कार झाला. त्या फडणवीसांच्या जीवावर पोपटासारखे बोलणाऱ्या पडळकर यांनी स्वतःची लायकी तपासून टीका करावी असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना केली आहे.


 


 


 


 


काय आहे हे प्रकरण.....


 


 


 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना नुकतेच आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान पडळकर यांनी केलं आहे. मात्र पडळकर यांनी स्वतःची राजकीय उंची न तपासताच राज्यातील ज्येष्ठ नेत्याबद्दल अशी वक्तव्य करताना स्वतःच्या राजकीय उंचीची कल्पना पूर्ण महाराष्ट्राला जाणन दिली आहे


 


 


 


 


 


शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत होत नाही. पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र्र फडणवीस  त्यांनाा सत्तेची डोक्यात घुसली आणि त्यांनी पवार साहेबांचं राजकारण संपलं असेेेेे म्हणत विधानसभा निवडणुकीत प्रचार केला.  हा प्रचार महाराष्ट्राच्या शेतकरी राजा, नवीन युवक व माता-भगिनींना रुचला नाही आणि नियतीने फडणवीस यांच्या पासून मुख्यमंत्र्याची खुर्ची हिरावून घेतली. त्यांनाही  आपण मुख्यमंत्री झालो नाही याची सल नेहमी टोचत आहे. तीच सल अजित पवारांशी विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त करून स्वतःची लायकी समजलेल्या पडळकर त्यांची झाली आहे अशी टीका वाघेरेे यांनी केली आहे.  


 


 


 


 


धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयास आलेल्या पडळकर यांना बारामतीमधील धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.  त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. ज्या भाजपात ते सध्या आश्रयी आहेत, त्या भाजपाने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असे जाहीर केले होते. त्यांनी पाच वर्षे धनगर समाजाला खेळवलं. आता सत्तेवरून गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधात व ज्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही त्यांच्यावर टीका करण्यास नव्या वाचाळवीर पडळकर यांना माध्यमांसमोर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे ज्यांच्या गळ्यातील पट्टा घातला आहे त्या भाजपने त्यांच्या समाजासाठी काय केले याची माहिती तपासावी असा प्रतिसवाल संजोग वाघेरे पाटील यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना केला आहे.