शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात' स्पर्धेचे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


-


 


पुणे :- शिवजयंती महोत्सव समिती तर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजन : स्पर्धेकरीता विनामूल्य प्रवेश 


 


पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन (दि. ६ जून) यंदा सार्वजनिकरित्या नव्हे, तर घराघरात साजरा करावा, यासाठी शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेकरीता प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले आहे. 


 


शिवशके ३४० म्हणजेच सन २०१३ पासून समितीच्या वतीने ही संकल्पना राबविण्यात येते. संकल्पनेचे यंदा ८ वे वर्ष असून प्रथमच या संकल्पनेला स्पर्धेचे स्वरुप देण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक म्हणजे शौर्याचे, पराक्रमाचे, अभिमानाचे, तेजाचे प्रतिक आणि शिवशक प्रारंभाचा स्वराज्य नववर्षाचा पहिला दिवस. त्यामुळे हा दिवस सण व महोत्सवाप्रमाणे घराघरात साजरा व्हावा, ही यामागील संकल्पना आहे. 


 


अमित गायकवाड म्हणाले, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वराज्यगुढी भगव्या स्वराज्यध्वजासह घरोघरी उभारुन शिवरायांचे तैलचित्र, पुतळा, रंगावली, फुले वा आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करुन आकर्षक सजावट करायची आहे. तसेच पारंपरिक पोशाख परिधान करुन घरात गोडधोड बनवून सहकुटुंब साजरा करतानाचे दोन फोटो मो. ९८२२०८३७१० या क्रमांकावर पाठवायचे आहेत. स्पर्धा दोन विभागात होणार असून भारतात व भारताबाहेरील कुटुंबे यामध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेकरीता ७ जून दुपारी १२ पर्यंत आलेले फोटो ग्राह्य धरले जाणार असून विज्येत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक दिले जाईल. तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभाग नोंदवावा.