डॉ नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मदतीमुळे लॉक डाउन कालावधीत पॅरिस मध्ये अडकून पटलेले भारतात सुखरूप परत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेस नोट


*.*


 


 


पुणे:- पॅरिस येथे ऑफिसच्या कामासाठी गेलेले श्री अभिषेक अशोक आदक हे कोविड१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लॉक डाउन मुळे पॅरिस येथेच अडकून पडले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व विमाने रद्द केली होती. तसेच लॉक डाउन किती दिवस असेल याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यामुळे श्री अभिषेक यांचे वडिलांनी श्री अशोकानंद जवळगावकर नवी मुंबई यांचे मार्फत डॉ नीलम गोऱ्हे आमदार व माजी उपसभापती विधान परिषद यांना संपर्क साधला. तात्काळ डॉ गोऱ्हे यांनी आवश्यक विभागांना सूचना दिल्या व त्यांचे कार्यालयाने भारतीय दुतावासास संपर्क साधला. डॉ गोऱ्हे यांचे तात्काळ प्रयत्नांनी श्री अभिषेक आदक दि १६ जून २०२० रोजी भारत सरकारच्या वंदे भारत च्या विशेष विमानाने नवी दिल्ली येथे आले. नवी दिल्ली मध्ये शासनाच्या सुचने प्रमाणे ७ दिवस संस्थात्मक विलगिकरणामध्ये राहीले. व आज ते पुणे येथे घरी पोहोचले. आज पासून १४ दिवस ते घरीच विलगिकरणात राहणार आहेत. अभिषेक व त्यांच्या कुटुंबाने व श्री जवळगावकर यांनी डॉ नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले. व अश्या कठीण प्रसंगी डॉ गोऱ्हे यांनी दिलेले प्रोत्साहन व केलेली मदत ही न विसरता येणारी असल्याचे ही म्हटले आहे.