उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, ३ जून २०२०: ओपेक आणि रशियाने कच्च्या तेलातील भरीव उत्पादन कपात पुढील काही महिने कायम ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमती ३.८७ टक्क्यांनी वाढून ३६.८ डॉलर प्रति बॅरलवर थांबल्या. रस्ते आणि हवाई वाहतूक सुरू झाली, अनेक ठिकाणचे कारखाने आणि उत्पादन सुरू झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील काही महत्त्वाचे व्यापारी करार रद्द करण्यावरून तणाव वाढत आहे. हा करार रद्द झाल्यास कच्च्या तेलाची मागणीही कमी होईल.


 


अनेक व्यवसायांमध्ये जोखीमीच्या मालमत्तेची मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमती ०.७४% नी कमी होऊन त्या १७२७.० डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. अनेक देशांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केले तसेच वेगाने आर्थिक सुधारणेसाठी योजना आखल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसून आली.


 


चांदीच्या किंमती ०.९९ टक्क्यांनी घसरून १८.१ डॉलर प्रति औसांवर आल्या. एमसीएक्सवर त्या ३ टक्क्यांनी घसरून ४९,०८० रुपये प्रति किलोवर थांबल्या. 


 


चीनमधील औद्योगिक कामकाज सुरू झाल्यामुळे लंडन मेटल एक्सचेंजवरील बेस मेटलच्या किंमती सकारात्मक स्थितीत बंद झाल्या. तथापि, हेज फंड्स अजूनही औद्योगिक धातूंमध्ये मोठी झेप घेऊ शकलेले नाहीत. यामुळे बाजारपेठा सावध आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साथीच्या आजारासाठी चीनला दोषी धरल्यामुळे अमेरिका-चीनमधील तणाव कायम आहे. काही वृत्तांनुसार, चीनने अमेरिकेतील शेती उत्पादनांमधील मोठी खरेदी थांबवली आहे. यातून व्यापार युद्धात भर घातली असून यामुळे बेस मेटलच्या किंमतीवरही मर्यादा आल्या आहेत.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image