राज्यात रोजगार वाढणार याचे भाजपाला पोटशूळ : संजोग वाघेरे पाटील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


 


पिंपरी दि.  कोरोना व्हायरसने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढवणार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य सरकारने उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात १६ हजार ३० कोटीची गुंतवणूक आणली, ही सामान्य नागरिकासाठी कौतुकास्पद बाब आहे. याचे स्वागत सर्व पक्षाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र चांगल्या कामाची स्तुती करण्यापेक्षा भाजप फोटोवरून वादंग निर्माण करून राज्याप्रती बेगडी प्रेमाचा दिखावा करताना दिसत आहे. राज्यातील युवकांना रोजगार मिळणार यांच्या आनंद साजरा कारण्यापेक्षा भाजपच्या पोटात पोटशूळ आले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लगावला आहे.


 


काय आहे हे प्रकरण.....


 


सोमवार दि. १२ जून रोजी महाविकास आघाडी सरकारने "मॅग्नेटिक महाराष्ट्र २:००" मध्ये विविध १२ देशातील गुंतवणूकदारासोबत १६ हजार ३० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती टाकली. या ट्विटर अकाउंटवर मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागील मॅग्नेटिक महाराष्ट्राचा फोटोतील नकाशा नजरचुकीने उलट (आरशातील प्रतिबिंब सारखा) झाला. कदाचित एखाद्या अधिकार्याच्या अथवा प्रिंटिंग मध्ये चुकीचा झाला असावा. हे समजून न घेता थेट सरकार व मुख्यमंत्र्यावर ''भाजपा महाराष्ट्र'' ट्विटर अकाउंटवरून महाराष्ट्रद्रोही असा आरोप करणे निंदनीय आहे, असे वाघेरे म्हणाले.  


 


 


रेल्वेचे ४० हजारांहून अधिक क्वारंटाईन रेल्वेचे डबे कुठे गेले....  


 


तात्कालीन फडणवीस सरकारने २०१८ साली महाराष्ट्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे भविष्यवाणी केली होती. भविष्यात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणारा असा डांगोरा पिटला होता. मात्र आजअखेर तो विकास दिला नाही. कोरोना परिस्थिती हाताळताना महाविकास आघाडीतील सर्व मंत्री चांगले काम करत आहेत, यात तीन मंत्र्याना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कधी जेवणात, कधी रुग्नांना उपचार मिळत नाही तर नुकतेच कोरोना रुग्णाच्या शव गायब झाल्याचे आरोप करत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. तर त्याचे केंद्रातील भाजप सरकारने मुंबईमधील रेल्वे गाड्यात ४० हजारांहून अधिक क्वारंटाईन रेल्वेचे डबे बनवून घेतले. त्यामध्ये जनतेचा कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला आहे. याचा शोध किरीट सोमय्या व त्याच्या भाजप पक्षाने करावा असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.