भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते राधाकिसन छोटूलाल पुरोहित यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते


  


ताडीवाला रोड येथे राहणारे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते राधाकिसन छोटूलाल पुरोहित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ७२ वर्षांचे होते . त्यांच्यामागे दोन मुले , एक मुलगी , सुना ,जावई व नातवंडे असा परिवार आहे . भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष व ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत नगरसेवक व अखिल राजस्थानी समाज संघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस जयप्रकाश पुरोहित यांचे ते वडील होते .


 


   सन १९६६ पासून त्यांनी जनसंघाचे काम सुरु केले .त्यांनी भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष , भवानी पेठ विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष काम केले . त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)