वावलोळी,भालीवडी आणि तिवरे ग्रामपंचायत मधील रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 नेरळ,ता.10बातमीदार


                          कर्जत तालुक्यातील भालीवडी,तिवरे आणि वावलोळी ग्रामपंचायत मधील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आज 10 जून रोजी करण्यात आला.आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते त्या सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून त्या तीन कामांसाठी 53 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. 


                     कर्जत तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते करण्यात आले. त्यात वावलोळी ग्रामपंचायत मधील कुंडलज ते भातगाव या रस्त्याचे कामासाठी 23 लाखाचा निधी उपलब्ध आहे.तर तिवरे ग्रामपंचायत मधील लाडीवली फाटा ते लाडीवली गाव या रस्त्याचे कामासाठी 17 लाख पन्नास हजार आणि भालिवडी ग्रामपंचायत मधील भालीवडी गावाकडे जाणारा रस्त्यासाठी सुमारे 13 लाखांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खर्च करून रस्त्याची कामे करण्यात येत आहेत.या कामांचे कोनशिला अनावरण आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,रायगड जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे,आदी उपस्थित होते.


 


 


 


 


 


फोटो ओळ 


तिवरे ग्रामपंचायत मधील रस्त्याच्या कामाचे कोनशीला अनावरण करताना आमदार थोरवे