हिंदू साम्राज्य दिन नव्हे तर शिवराज्याभिषेक दिनच..!! -संभाजी ब्रिगेड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


 


छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेच राज्य निर्माण केलं त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या कोंदणात बांधून संकुचित करण्याचा कुटील डाव सध्या धर्माच्या ठेकेदारांनी मांडला आहे, तो आम्ही निश्चितच हाणून पाडू. कारण जगाच्या इतिहासात असा राजा होणे नाही, नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार, प्रजादक्ष, राष्ट्राभिमान स्वाभिमान, सर्व सामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, केवळ विचारातून नव्हे तर कृतीतून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम या महामानवानं केलं. अशा जागतिक कीर्तीच्या राजाचा राज्याभिषेक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. शिवरायांच्या जीवन चरित्रातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रचंड मोठी प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेड चे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले.


 शिवराज्याभिषेक दिना निमित्त अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित ऐतिहासिक लाल महालातील छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका स्मिता वस्ते, विश्रामबागवडा अधिकारी आशिष महाडकर, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे ,शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, विराज तावरे, कैलास वडघुले उपस्थित होते. यावेळी शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.