काश्मिरमध्ये भारतीय सैनिक करणार 'दगडूशेठ' ची प्रतिष्ठापना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


काश्मिरमध्ये भारतीय सैनिक करणार 'दगडूशेठ' ची प्रतिष्ठापना-


लष्करातील ६ मराठा बटालियनसाठी श्रीं ची फायबर ग्लास मधील ३६ इंचाची प्रतिकात्मक मूर्ती रवाना ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चा पुढाकार


 


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. त्यामुळे श्रीं च्या दर्शनासाठी येणा-या भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकतीच ही मूर्ती रेल्वेने काश्मिरकडे रवाना झाली. 


 


भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या वतीने जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा सैनिकांनी व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे कमांडिंग आॅफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठविले. 


 


कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, आमचे युनिट सध्या गुरेज सेक्टर, जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. आम्ही येथे एक गणेश मंदिर बनवले आहे. मंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूतीर्ची कायमस्वरूपी स्थापना करु इच्छितो. या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुुळे आमच्या मंदिराची शोभा वाढेल. याकरीता आपण अडीच फुटांची गणेश मूर्ती मंदिरासाठी भेट म्हणून द्यावी.


 


सन २०११ पासून ६ मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून मूर्ती भेट म्हणून पाठविण्याचे ट्रस्टने ठरविले. शिल्पकार विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल खटावकर यांनी अल्पावधीत ही मूर्ती बनवली. दगडूशेठ गणपती मंदिरात धार्मिक विधी करुन ही फायबर ग्लास मधील ३६ इंचाची मूर्ती सैनिकांकडे सोपविण्यात आली. 


 


तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.