सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरिकांनी मास्कचा वापर करावा- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


**


 


       पुणे दि. 21: कोरोनाच्या विषाणूच्या लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून रुग्ण तपासणी मोहिम हाती घेतल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते आहे. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी नेहमी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.


      आज रोजी ऑनलाईन पत्रकार परिषदेद्वारे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


     यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आवाहन करतांना म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क लावणे, सभोवतालचा परिसर निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वेळोवळी साबणाने हात धुणे, वयोवृदध व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी घेणे तसेच शारिरीक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे, इत्यादीबाबींवर जनजागृती करुन सोसायटीमध्ये अशा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.


***** 


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image