अखेर हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 कर्जत,ता.26 गणेश पवार


                             कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या कार्यकारी समितीने मागील वर्षी इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र वर्षभर इमारत बांधण्यावरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई थांबली असून व्यायामशाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात झाली आहे.


                             कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या पुनर्रबांधणीच्या प्रस्ताव दीड वर्ष वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, याशिवाय हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या मैदानावर कुठलेही बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशा तक्रारी शासनदरबारी दाखल केल्या होत्या.परंतु हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या मैदानावर विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतल्यानंतर 2 डिसेंबर 2019 रोजी संबंधित ठेकेदाराने मजुरांच्या आणि जेसीबी यंत्राच्या साहाय्याने या जागेवर बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदले गेले होते.मात्र त्यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींमुळे कर्जत नगरपालिका तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगरपरिषदेच्या वतीने नोटीस बजावून परवानगी रोखली होती.त्यानंतर मुख्यधिकारी कोकरे यांच्या लेखी आदेशान्वये रचना सहाय्यक लक्ष्मण माने यांनी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर विश्वस्त मंडळाच्या विरुध्द कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


                            त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विश्वस्त मंडळानी आपल्या वकिलांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली याचिका 6 डिसेंबर 2019 रोजी फेटाळून लावली होती.संबंधित कागदपत्रे कोतवाल व्यायाम मंडळाने कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी कागदपत्रांची तपासणी करून हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर नव्याने बांधकाम करण्यास सशर्त परवानगी आहे.त्यामुळे व्यायाम शाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात करण्यात आली.कर्जत नगरपालिका मधील स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले .


                          सदरची जागा धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या अटी आणि शर्ती यांच्या अधीन राहून हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा नव्याने उभारली जात आहे.कर्जत नगर परिषदेने सदर जागेत हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा आणि व्यापारी संकुल तसेच इतर बांधकाम करण्यास सशर्त परवानगी कर्जत नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या इमारत बांधकाम प्रसंगी नगरसेविका भारती पालकर,विशाखा जिनगरे यांच्यासह हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दुर्गे,सचिव शंकर भिंगारे,खजिनदार उदय मांदुस्कर, विश्वस्त शिवाजी भासे, सुनील दुर्गे,गणेश ढमाले,रमेश देशमुख,मोरेश्वर देशमुख,अविनाश बेडेकर,शशिकांत कडव,आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)