कर्जत नगरपालिकेचा लॉक डाऊन काळात कामगारांबाबत सकारात्मक निर्णय

.... 2013 पासूनची सुरक्षा ठेव सफाई कामगार संघटना यांच्या कडे सुपूर्द,8 वर्षाची देणी दिली


 


कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदार मार्फत काम दिले जाते.मात्र त्या सफाई कामगारांच्या ठेवी पालिका सुरक्षा ठेव म्हणून आपल्याकडे ठेवत असते.गेली चार महिने सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.हे लक्षात घेऊन कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुढाकार घेऊन सफाई कामगार ठेकेदारांच्या म्हणजे पर्यायाने सफाई कामगारांच्या सुरक्षा ठेवीची आठ लाख 40 हजार एवढी रक्कम सुवर्णमध्य काढुन देण्यात आली आहेत.दरम्यान,गेली आठ वर्षे कामगार आपल्या नावे पालिकेकडे असलेल्या सुरक्षा ठेवीची मागणी करीत होते,पालिकेच्या या निर्णयाने 42 सफाई कामगारांना त्याचा फायदा मिळणार आहे.


                           कर्जत नगरपालिका हद्दीत आरोग्य खात्यात सफाई कामगार काम करीत असून त्या कंत्राट पध्दतीने काम करणाऱ्या सफाई कामगार यांना पालिकेत काम हे त्यांचे ठेकेदार यांच्या माध्यमातून मिळत असते.2013 पासून कर्जत नगरपालिका प्रशासनाला सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने देणारे चार ठेकेदार काम करीत होते.त्या चार ठेकेदारांकंदील 42 कामगार गेली आठ वर्षे पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत.त्या कामगारांची सुरक्षा ठेव ही पालिका ठेकेदारांच्या बिलमधून कापून पालिकेकडे ठेवत होती.मागील सात वर्षे पालिकेच्या तिजोरीत जमा असलेली ही रक्कम पालिकेने द्यावी यासाठी मागील वर्षभर हे सफाई कामगार सातत्याने कामबंद आंदोलन,तसेच अन्य आंदोलन करीत आले आहेत.त्यामुळे थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या सफाई कामगारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन ठेवीची सुरक्षा रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.


                           त्यात मागील चार महिने कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्ष जोशी यांनी लॉक डाऊन काळात कामगार वर्गाला पैशाची असलेली मदत लक्षात घेऊन सफाई कामगारांचा अनेक वर्षे जुना विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी 2013 पासून पालिकेला सफाई कामगार पुरविणारे चार ठेकेदार यांची सुरक्षा ठेव रक्कम याची माहिती घेतली. त्यानंतर पालिकेतील सफाई कामगार यांची कामगार संघटना असलेल्या दि म्युनिसिपल कामगार संघटना यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.2013 पासून काम करणाऱ्या 42 सफाई कामगारांची फरकाची रक्कम ही साधारण आठ लाख 40 हजार होते.ती रक्कम पालिकेतून तिजोरीतून तात्काळ देता येईल का?याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याशी नगराध्यक्ष जोशी यांनी चर्चा केली. त्यानंतर सफाई कामगारांची 2013 पासून प्रलंबित असलेली सुरक्षा ठेव ची 8 लाख 40 हजाराची रक्कम 24जून रोजी सफाई कामगार संघटना प्रतिनिधी तसेच अध्यक्ष पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक अरविंद मोरे आणि सफाई कामगार यांच्या उपस्थितीत धनादेश स्वरूपात देण्यात आली.ती रक्कम नंतर कामगार संघटना 2013 पासून काम करणाऱ्या कामगारांना फरकाच्या स्वरूपात देणार आहे.म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना कर्जत पालिका युनियन अध्यक्ष अरविंद मोरे यांच्यासह सफाई कामगार राहुल गायकवाड, स्वनिल सोनवणे,उमेश बाळू गायकवाड यांच्या धनादेश नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी सुपूर्द केला.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image