अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने इतर चलन धारकांसाठी सोने महाग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, २६ जून २०२०: अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने इतर चलन धारकांसाठी सोने महाग झाले. त्यामुळे गुरुवारी, स्पॉट गोल्डच्या किंमती १७६१ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. तथापि, विषाणूच्या दुसऱ्या आणि संभाव्य लाटेमुळे सोन्याचे दर स्थिर राहिले. तसेच बाजाराच्या विश्लेषणात, साथीच्या आजारानंतर आर्थिक सुधारणांचा काळ आधीच्या अंदाजापेक्षा खूप मोठा असू शकतो, असे दर्शवले. त्यामुळेही सोन्याचे भाव स्थिर राहिले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


 


स्पॉट सिल्व्हरचे दर २.०५ टक्क्यांनी घसरून १७.९ डॉलर प्रति औसांवर आले. एमसीएक्सवरील दर ०.६९ टक्क्यांनी वाढले. ते ४८११६ रुपये प्रति किलोवर बंद झाले.


 


जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील आर्थिक कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कच्च्या तेलाचे दर १.८७ टक्क्यानी वाढून ३८.७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अनेक आशियाई, युरोपियन आणि अमेरिकी देशांनी त्यांच्या नागरिकांवर कामावर जाण्याची परवानगी दिल्याने बेरोजगारीचा उच्चांकी दर काही कमी झाला.


 


मागणी कमी झाल्याने ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंपनीने उत्पादनात तीव्र कपात केल्यानेही तेलाच्या किंमती वाढल्या. या महत्त्वाच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. तथापि, अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, यूएस क्रूड इन्व्हेंटरीची पातळी १९ जून २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात १.४ दशलक्ष बॅरलनी वाढली. अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीची पातळी वाढल्याने जागतिक मागणी कमी झाल्याचे संकेत मिळतात. याचा परिणाम बाजारातील भावनांवर झाला.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image