लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी केली शेतात भातलावणी*  अस्सल मातीतल्या अभिनेत्याने केला शेतकऱ्यांना मानाचा मुजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी केली शेतात भातलावणी*  


-


- शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा 78 वा वाढदिवस  


 


'शेती विकायची नसते ती राखायची असते' असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात आज त्यांनी वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसमवेत भात लावणी केली. यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला. भात लावणी आणि वडील विठ्ठल तरडे यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना प्रविण तरडे म्हणाले की, सध्या लॉकडाऊन मुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत यामुळे मी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आई – वडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात. पुण्या – मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे असे सांगत आपलं शेत आपण कसले पाहिजे असंही ते म्हणाले. तसेच त्यांनी कोरोना, कोविड १९ आणि लॉकडाऊनच्या काळात शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आहे त्याला यावेळी सलाम केला. मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)