सिग्नलवर अनधिकृतपणे "मास्क" विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 मा. संपादक,


दैनिक :


आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धीस द्यावे हि विनंती..


विषय : सिग्नलवर अनधिकृतपणे "मास्क" विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात.. 


महोदय,


कोरोना या महामारीमुळे संपुर्ण जगातील नागरिक पुरते संकटात आहेत. त्यामुळे भारताच्या आयुष मंत्रालयाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिक पालन करत आहेत. जसेकी तोंडाला व नाकाला मास्क वापराने व वेळोवेळी हात धुवत आहेत किंवा सॅनिटायझरचा वापर करत आहेत. परंतु ह्याच संधीचा काही जण दुरुपयोग करत आहेत. 'जागोजागी सिग्नलवर मास्कची खुलेआम विक्री सुरु आहे. दुकानांमध्ये महाग मास्क विकत घेण्यापेक्षा नागरिक सिग्नल वरील कमी किमतीत मिळणारे हे मास्क सर्रास विकत घेत आहेत'.


सिग्नलवर विकण्यात आलेले मास्क हे अत्यंत दुय्यम दर्जाचे आहेत तसेच हॉस्पिटलच्या आवारातून व आजूबाजूच्या कचराकुंडीतुन हे मास्क उचलून येथे विकण्यास उपलब्ध करून देत आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच सिग्नलवर मास्क विक्री करणाऱ्यांची व घेणाऱ्यांची कधीहि कोरोना टेस्ट केली जात नाही त्यामुळे जर यामध्ये एखादा जर कोरोना पॉसिटीव्ह असल्यास याची लागण होऊन कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.   


तरी आपणास विनंती कि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अनधिकृतपणे व दुय्यम दर्जाचे मास्कची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी हि नम्र विनंती. अश्या प्रकारचे निवेदन दि ११/०६/२०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतृशृंगी पोलीस ठाणे, पुणे, यांना देण्यात आले. सहकार्य असावे,


कळावे,


                                                   आपला राष्ट्रबांधव,


सुहास भगवानराव निम्हण


(अध्यक्ष : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image