मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरूवात       जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


पुणे, दिनांक 7- पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी झालेली आहे. तसेच शेतीपीक, पॉलीहाऊस व शेडनेट यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित नागरीक व शेतकरी यांना शासन निर्णयाप्रमाणे देय मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरू असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.


 


            आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. शासन निर्णयाप्रमाणे देय मदतीची रक्कम तहसिल कार्यालयामार्फत नागरीक व शेतकरी यांच्या बँकेतील खात्यावर चेक व आर.टी.जी.एस.व्दारे जमा करण्‍यात येत आहे. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे मदत म्हणून दिलेली रक्कम नागरीक व शेतकरी यांच्या खात्यावरून परस्पर त्यांच्या कर्ज खाते व इतर खाती यामध्ये समायोजीत किंवा कपात करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांना दिल्‍या आहेत.


 


            सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी नैसर्गिक आपत्तीमुळे मदत म्हणून देय रक्कम नागरीक व शेतक-यांच्‍या अन्य कर्ज खाती व इतर खाती यांच्यामध्ये परस्पर समायोजित किंवा कपात करण्‍यात येवू नये असे स्‍पष्‍ट केले आहे. अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा जिल्‍हाधिकारी राम यांनी दिला आहे.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image