कर्जत पोलीस ठाण्याचे कोठडीत असलेल्या एका आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह.. अन्य आठ जणांच्या टेस्ट निगेटिव्ह कर्जत,ता.7 गणेश पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


                       कर्जत पोलीस ठाण्याची पोलीस कोठडी असलेल्या तहसिल कचेरीच्या कोठडीत असलेला आरोपी कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.कोठडीत असलेल्या नऊ आरोपींना तळोजा जेल मध्ये न्यायचे असल्याने न्यायालयाने त्या सर्व आरोपींच्या कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान,नऊ आरोपींच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आणि त्यातील एका आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली असून कोरोना पॉझिटिव्ह तरुण सावळे गावातील आहे.


                      कर्जत तालुक्यातील सावळे गावात 25 मे रोजी दोन गटात हाणामारी झाली होती आणि गटातील मिळून तब्बल 32 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्या गुन्ह्यातील एका गटातील 9 आरोपींना कर्जत पोलिसांनी अटक केली होती. त्या अटक करण्यात आलेल्या आरोपींना 3 जून रोजी सावळे येथे आणण्यात आपि होते.त्या सर्व 9 आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते आणि तळोजा जेल मध्ये नेण्यापूर्वी त्या सर्व आरोपींची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले होते.तळोजा न्यायालयात नेण्यापूर्वी त्या सर्व आरोपींची कोरोना टेस्ट करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात स्वाब घेण्यात आले होते आणि त्या टेस्ट चे अहवाल आज 7 जून रोजी प्राप्त झाले असून नऊ पैकी एक 25 वर्षीय तरुणाचे कोरोना टेस्ट चे अहवाल पॉझिटिव्ह तर अन्य आठ आरोपींचे कोरोना टेस्टचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.मात्र न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.यापूर्वी खांडस येथील खून प्रकरणी अटक असलेल्या आरोपींची नेरळ पोलिसांनी कोरोना टेस्ट केली होती आणि त्या 11 आरोपींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तळोजा जेल मध्ये त्यांची रवानगी करण्यात आली होती.


                          मात्र न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला कोरोना झाल्याने प्रशासन देखील सतर्क झाले आहे.कारण आरोपींना दररोज मेडिकल तपासणी करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यामुळे त्या तरुण आरोपीला कोरोना ची लागण ही नक्की कुठे झाली?याचा शोध प्रशासन घेत आहे.त्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे दैनंदिन तपासणी करताना कोरोना झाली की सावळे गावात नेले असता कोरोना झाला याबाबत माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.सावळे गावात आरोग्य विभाग पोहचला असून त्या 25 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात सावळे गावातील कोण आले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.मात्र या नवीन रुग्णाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 31 वर पोहचली आहे.त्यात सध्या कर्जत तालुक्यातील 15 रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत,तर 13 जणांनी कोरोना वर मात केली आहे आणि तीन रुग्णांचा मृत्यू झाला