डिस्कव्हर हॉटेल बनले पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


12 पोलिसांवर उपचार सुरू


 


कर्जत,ता.27  गणेश पवार


 


                          देशात लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून राज्यातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट तसेच खासगी हॉस्पिटल ही शासनाने ताब्यात घेतली होती. त्यात शासनाच्या ताब्यात असलेल्या नेरळ जवळील डिस्कव्हर हॉटेल चा समावेश होता.दरम्यान,कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस रुग्णांना आता त्या हॉटेल मध्ये ठेवून उपचार केले जात असून त्या ठिकाणी जे 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोन्टाइन केले आहेत,त्या सर्व रुग्णांचे केवळ अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना कोरोना ची कोणातीही लक्षणे नाहीत. 


 


                           कर्जत तालुक्यातील जून महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना कोरोनाने ग्रासले आहे.मागील काही दिवसात सातत्याने पोलीस कर्मचारी हे कोरोना मुळे बाधित झाले आहेत.त्यात पहिल्या टप्प्यात कोरोना चा संसर्ग झाल्यानंतर त्यांना मुंबई मरोळ येथील कोविड रुग्णालयात उपचार केले जात होते.मात्र मागील आठवड्यात नेरळ पोलीस ठाण्यातील तब्बल 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.मात्र त्यातील 10 पोलिसांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नव्हती.ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येत होती, त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत.परंतु कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या नेरळ पोलीस ठाण्यातील 10 आणि कर्जत पोलीस ठाण्यातील दोन अशा 12 पोलिसांना नेरळ जवळ असलेल्या हॉटेल मध्ये कोरोन्टाइन करून आरोग्य विभागाने उपचार सुरू केले आहेत.


 


                            लक्षणे नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डिस्कव्हर रिसॉर्ट मध्ये कोरोन्टाइन करण्यात आले आहे. त्यावेळी त्या हॉटेल मध्ये नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे सकाळ-संध्याकाळ तपासणी करीत आहेत.त्या ठिकाणी 12 पोलिसांसह अन्य दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देखील उपचार घेत आहेत.त्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था झाली असून कोरोना ची कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना या ठिकाणी उपचार केले जात आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना  


 


नेरळ पोलीस स्टेशन कडून भोजनाची व्यवस्था केली जात आहे.


 


  


 


फोटो ओळ 


 


डिस्कव्हर हाँटेल नेरळ धामोते


 


छायः गणेश पवार