पोलिस आयुक्त व्यंकटेशम् यांनी 'डिक्की'च्या उपक्रमांचे केले आहे कौतुक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


उपक्रमाचे केले कौतुक 


 


पुणे, दि.३० : लाॕक डाऊनच्या काळात 'डिक्की' तर्फे गरीब गरजूंसाठी राबविण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे पोलीस आयुक्त के.व्यकटेशम् यांनी सांगितले. 


   दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, राजेश बाहेती, भारत आहुजा, राजू वाघमारे, महेश राठी, चेतन पटेल हे उपस्थित होते. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील 7 निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन येथून करण्यात येत आहे.पोलिस आयुक्तांनी काल याठिकाणी भेट दिली,त्यावेळी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.


  भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना 20 दिवस पुरेल इतके रेशन तर पुणे शहरातील 15 हजार 509 कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, डाळ यांचा समावेश असलेल्या किराणा मालाचे किट या संस्थेमार्फत वितरित करण्यात आले. या संस्थेच्या उपक्रमाचा जवळपास २ लाखा नागरिकांना लाभ झाला असल्याचे यावेळी श्री. कांबळे व श्री .बाहेती यांनी सांगितले.    


-----------