शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड वार्ड क्रमांक 4 च्या वतीने बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना, वार्ड क्रमांक 4 मधील भाजी मंडई इतरत्र हलविणे बाबत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


तसेच व्यवसायिक दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देणेबाबत निवेदन सादर


 शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड वार्ड क्रमांक 4 च्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये पुणे कँटोन्मेंट बोर्ड वार्ड क्रमांक 4 मधील भाजी मंडई सुरु झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर आणि प्रशासनावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही भाजी मंडई इतर हलविण्यात यावी तसेच लोकांचा रोजगार सुरू होऊन त्यांची उपजीविका चालावी व गरजू सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत गरजेच्या वस्तू पोहोचाव्यात याकरिता पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील व्यवसायिक दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत चालू करण्यास परवानगी देण्यात यावी या मागण्या निवेदनात करण्यात आल्या. तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर होत चाललेली बिकट परिस्थिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली गेल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे याकरिता शिवसेना वार्ड क्रमांक 4 च्या वतीने मा. मुख्यमंत्री आणि बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी वार्ड क्रं. 4 चे विभाग प्रमुख मोहन यादव, शाखा प्रमुख किरण कांबळे,कॅन्टोन्मेंट बोर्ड विभाग प्रमुख अतुल गोंदकर,कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख राजेश शहा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image