स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


 


 


कोरोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळू हळू पूर्वपदावर येतेय. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झालीय. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात आला. सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत सेटवर शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.


 


कलाकारांसाठी सेट म्हणजे दुसरं घर असतं. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर सेटवर पुन्हा हजेरी लावल्यानंतर कलाकारही आनंदात होते.


 


आई कुठे काय करते मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या सेटवरच्या कुटुंबाला भेटून भारावून गेल्या होती. संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूटिंगला सुरुवात केली आहे. लवकरच नव्या भागासह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं मधुराणी म्हणाली.


 


मोलकरीण बाई मालिकेत अंबिका ही भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे म्हणाल्या, मी सेट, मेकअप रुम आणि माझ्या सहकलाकारांना खूप मिस केलं. आता शूटला सुरुवात झालीय त्यामुळे आनंद आहे. आम्ही स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घेत शूटिंग करत आहोत. प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी मी उत्सुक आहे अशी भावना सुप्रिया पाठारे यांनी व्यक्त केली.


 


तेव्हा स्टार प्रवाह वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्यासाठी सज्ज व्हा.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image