शिवसेना शाखेच्या 33 वर्धापन दिनानिमित्त माथेरानमध्ये रक्तदान शिबिर, 64 रक्तदात्यांनी केले रक्तदान 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


कर्जत दि. 11 गणेश पवार


 


          कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व शिवसेना शाखा माथेरानच्या ३३व्या वर्धापन दिना निमित्त माथेरान येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. माथेरान येथील हुतात्मा स्मारक येथे कर्जत -खालापूर तालुक्यातील हे ४०६ वे रक्तदान शिबिर होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.


             महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बघता नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करण्याची गरज आहे असे आवाहन काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत माथेरान शिवसेना शाखेच्या 33 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मंगळवार दिनांक 9 जून रोजी सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि माजी नगराध्यक्ष तथा माजी शहर प्रमुख स्व. कुमारभाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरात एकूण ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय व मानवतावादी कार्य केले आहे. 


        या प्रसंगी रक्तसंकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीच्या डॉ.पल्लवी जाधव, पुनम यादव, शिला वाघमारे, दर्शना उपाध्याय, राजश्री कवळे, प्रकाश ऐवाळे, स्नेहल, नितीन जाधव व राजेश सोळंकी यांनी केले तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी माथेरान नगरपरिषदेचे गट नेते प्रसाद सावंत, शकील पटेल, नगरसेविका वर्षा रोड्रिक्स, माजी नगरसेवक राजेश दळवी, कुलदीप जाधव यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका, शिवसेना, युवासेना, व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदींसह माथेरानकर सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.