रुबी हॉल मेन गेट याठिकाणी गड्डा नव्हेतर गड्डामय रस्ता असे भयाण चित्र पाहावयास मिळते???

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


**


 


 


*पुणे :* रुबी हॉल या हाॕस्पिटल च्या चौकात पाण्याची पाईप लाईन - पावसाळी गटार किंवा सांडपाणी वाहून नेणारे गटार यांचे सांडपाणी किंवा मैल वाहणारे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने, याठिकाणी एकीकडे कोरोनामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, रस्तावरून असे पाणी वाहत आहे.


 सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का??? हा मुळ प्रश्न आहे त्यामुळे अश्या समयी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याशी खेळखंडोबा करण्याचा अधिकार यांना कुणी दिला हे पाणी जर पिण्याच्या पाण्याची लाईन फुटली असेल तर, पिण्याचे पाणी वाया घालविणाऱ्यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ही कारवाई होणार का नाही आणि हे वाया जाणारे पाणी केव्हा थांबणार आहे का नाही??? तसेच या भागातील विद्यमान नगरसेवक - आमदार संबधित समाजसेवक गप्प का???