पुणे महानगरपालिकेच्या व्यायाम साहित्य पुरवण्याबाबत टेंडर क्रमांक ६0 मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


press note


 


**  


--------------


*व्यायाम साहित्य न पुरवता बिल काढण्याचा खटाटोप* 


--------------


*माहिती अधिकार कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार,पालिकेत आंदोलनाचा इशारा* 


 


पुणे :


 


अत्याधुनिक व्यायाम साहित्य पुरवण्याबाबत पुणे महानगरपालिकेचे टेंडर क्रमांक ६0 मध्ये भ्रष्टाचार झाला असून ठरल्याप्रमाणे सर्व व्यायाम साहित्य न पुरवता बिल काढण्याचा खटाटोप सुरु असून या भ्रष्टाचाराविरुद्ध निलेश प्रकाश निकम या 


माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे तक्रार केली असून मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिकेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे . 


 


  पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील व्यायाम शाळांसाठी अत्याधुनिक व्यायाम साहित्य पुरवणे बाबतची निविदा क्रमांक - ६०-हार्डवेअर- २३,सन -२०१९-२० यामध्ये पुणे महानगरपालिका साडेसात कोटी निविदा मंजूर करून काम पूर्ण व्हायच्या आधीच त्या ठेकेदारांना पैसे देत आहे,असा आरोप निकम यांनी केला आहे. 


 


  टेंडर साठी अटी शर्ती या सुद्धा ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार केलेले आहेत नियमानुसार अटी-शर्ती बदलायचे असेल तर इस्टिमेट कमिटीची मान्यता लागते सदर सेंटरच्या बाबत इस्टिमेट कमिटीची मान्यता नाही. याबाबतही योग्य तो पुरावा तक्रार कर्त्याकडे आहे.सदर टेंडर काढताना टेंडर मधील कोटेशन मधला रेटचा फरक - इतर कंपन्या व आरोफीट या कंपनीच्या रेट मधील फरक खूप आहे. याचा तक्रार कर्त्याकडे पुरावा आहे. तसेच कोरोना काळात सर्व भारत बंद असताना ओपन जिम व जिम साहित्य पुण्यात पोचले कोठून व कसे? ओपन जिम व जिम साहित्य टेंडर मध्ये लिहिलेल्या कंपणीचेच पुरवठा केले आहे का ? असेल तर तर त्याबाबत कोणत्या अधिकाऱ्याने खातरजमा केलेली आहे ? ओपन जिम व जिम साहित्य एकूण किती साहित्य कोठी मध्ये पोचले सदर सामान हे अर्धवट पोहोचलेले आहे. त्याबाबतचा ही सर्व योग्य तो पुरावा तक्रार कर्त्याकडे आहे. 


 


एकूण किती ठिकाणी ओपन जिम व जिम साहित्य द्यायचे होते त्यापैकी किती ठिकाणी ओपन जिम व जिम साहित्य पूर्णपणे बसवून झाले आहे सदर जिम के सामान हे पूर्णपणे बसून झालेले नाही. ज्या ज्या ठिकाणी ओपन जिम व जिम साहित्य बसविणे आहे त्या त्या ठिकाणी ते बसविले आहे की नाही ? साहित्य बसविले असेल तर त्याची खातरजमा कोणत्या अधिकाऱ्याने केलेली आहे ? त्याचा अहवाल सादर केला आहे का ? ज्या ठिकाणी ओपन जिम व जिम साहित्य बसविणे आहे तेथे ते न बसविताच बिल सादर केले आहे. ज्या ठिकाणी जिम साहित्य बसविले आहे त्या ठिकाणचे जिम साहित्य बसविल्या नंतर फोटो काढून ते बिला सोबत जोडले आहेत का ? ज्या प्रभागमध्ये जिम साहित्य बसवायचे आहे तेथेच साहित्य पुरविले आहे का ? पुणे महानगरपालिकेने पुराव्यासह सादर करावे. ठेकेदाराने टेंडर मध्ये दिलेल्या ब्रँड चेच जिम साहित्य पुरविले आहे का ?याबाबत कंपनीची काही पेपर सादर केले आहेत का. ठेकेदाराने टेंडर मध्ये दिलेल्या ब्रँड चेच जिम साहित्य पुरविले आहे का ? असेल तर याची खातरजमा कोणत्या अधिकाऱ्याने केली आहे ? त्याचा अहवाल सादर केला आहे का ,असेही प्रश्न निलेश प्रकाश निकम यांनी या तक्रारीत विचारले आहेत .    


 


             पुणे महानगरपालिकेने केलेला अजब कारभार म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून अर्धवट झालेले काम तसेच अर्धवट आलेले सामान पुणे महानगरपालिकेचे जमा करून ठेकेदाराने संपूर्ण बिल टाकले आहे. एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी निधी कमी पडत आहे आणि हे अंदाजपत्रकात असले तरी सध्याच्या परिस्थितीत या कामाची उपयुक्तता महापालिकेने तपासून पहावी. 


 


 यामध्ये ठेकेदार व अधिकारी यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे संगनमत अथवा आर्थिक देणे-घेणे झाल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. वरील सर्व गोष्टी या नियमानुसार आवश्यक आहेत पण पुणे महानगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सदर ठेकेदाराचे बिल जमा करून ते ऑडिटला पाठवले आहे. जर नियमानुसार एवढ्या गोष्टी अपूर्ण असताना सुद्धा व करूनच येवढं मोठं कोरोना संकट असून सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सदर ठेकेदाराच्या बिल देण्याची घाई का लागली आहे, हा प्रश्न मनाला भेडसावत आहे,असे निकम यांनी म्हटले आहे.  


 


     या सर्व गैरप्रकाराबाबत माननीय उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करीत आहे असेही निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे. जोपर्यंत सदर ठेकेदाराचा कामे पूर्णपणे होत नाही तोपर्यंत सदर बिल हे पास न करण्यात यावे तसेच संबंधित ठेकेदाराची केलेल्या कामाची चौकशी समिती बसून तपासून घेण्यात यावी तसेच त्यामध्ये जर तो दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे व जर पुणे महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याने त्यांना मदत केली असेल त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी निलेश प्रकाश निकम यांनी या तक्रारीत केली आहे. 


 


या तक्रारीच्या प्रति पालिका आयुक्त शेखर गायकवाड ,भांडार कार्यालय उपायुक्त सुनील इंदलकर आदींना पाठविण्यात आल्या आहेत. 


 


-------------------