माथेरानमधील सर्व कुटुंबांना दोन महिन्यांचे रेशन माथेरान वर प्रेम करणारे यांच्याकडून मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


कर्जत,ता.13 गणेश पवार


 


                        माथेरान मध्ये 17 मार्च पासून लॉक डाऊन सुरू असून पर्यटन हा एकमेव व्यवसाय बंद असल्याने माथेरान मधील सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे.त्यामुळे सामान्य जनतेचे हाल कमी करण्यासाठी माथेरान मधील सर्व कार्यकर्ते यांनी प्रयत्न करून माथेरान वर प्रेम करणाऱ्या आपल्या मित्रांना एकत्र केले.त्यांनी केलेल्या मदतीच्या आधारे माथेरान मधील सर्व कुटुंबांना तब्बल दोन महिने पुरेल एवढे धान्य यांचे वाटप केले आहे. दरम्यान,या मदतीमुळे माथेरान मधील नागरिकांना मदतीचा हातभार कुटुंबाचे चरितार्थ चालविण्यासाठी लागला आहे.


 


                             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या महासंकट काळात माथेरान सारख्या दुर्गम पर्यटन स्थळावरील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मागील तीन महिन्यांपासून मुंबई पुण्याकडील विविध संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.परंतु लॉक डाऊन कायम असल्याने याकामी येथील प्रमुख दिग्गज राजकीय मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबई पुण्यातील आपल्या जवळच्या मित्र मंडळींना इथल्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीची कल्पना देत सढळ हाताने मदत करण्याबाबत विनंती केल्यावरून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी त्यांचे मित्र नवीन केशवाणी आणि विश्वस्त कार्यमिती ट्रस्ट, मुंबई सुनील गंबानी यांच्या कडून सर्वाधिक भरीव मदत प्राप्त केली आहे.यामध्ये खाद्यतेलाचे 5 लिटर्सचे 1100 कॅन,मसूर 2200 किलो,चवळी  2200 किलो,मटकी 2200 किलो उपलब्ध करुन घेतली.माजी नगराध्यक्ष अजय सावंत,विवेक चौधरी यांनी सुध्दा आपल्या जवळच्या मित्र परिवार आणि संस्था यांच्या  माध्यमातून जीवनावश्यक वस्तू प्राप्त झाल्या होत्या. उद्योजक अतुल मेहता यांच्याकडून 6000 किलो कांदा,जे एम म्हात्रे अँड कंपनी यांचेकडून 6000 किलो बटाटा,दत्ताजी मसुरकर यांच्याकडून 1850 किलो साखर,पार्थ पवार फाउंडेशन यांचेकडून 4000 किलो साखर, अनिकेत तटकरे यांच्याकडून चवळी,तूरडाळ आणि हरभरा प्रति 600 किलो दिली आहे.माजी आमदार कुमार आयलानी यांच्याकडून रोख रक्कम 25000 आणि 50 बॉक्स पारले जी बिस्कीट,अहमद मकानी यांनी 10 बॉक्स पारले बिस्कीट दिले.तर नयनभाई विकमसी यांच्या मार्फत खाद्यतेलाचे पाच लिटर्सचे 100 कॅन,कासम शेख यांच्या माध्यमातून खाद्यतेलाचे पाच लिटर्सचे 100 कॅन उपलब्ध केले आहेत. 


 


                       शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांच्या प्रयत्नातून खाद्यतेलाचे 5 लिटर्सचे 100 कॅन,कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून 1000 किलो तूरडाळ,बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याकडून 1000 किलो साखर,माथेरान हॉटेल असोसिएशन मार्फत 2250 किलो,हरभरा तर एपीआय सिव्हीलकोन यांच्याकडून 50000 रुपये आणि प्रमोद देसाई यांच्या कडून 21000 रुपये रोख रक्कम मदत प्राप्त करून घेतली.माथेरान महोत्सवाचे अजय सावंत, विवेक चौधरी आणि संतोष पवार यांचे प्रयत्नातून माथेरान मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी माथेरान प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये जवळपास चार लाखांपेक्षा अधिक रक्कम वर्ग दिली आहे. या रक्कमेतून जीवनावश्यक साहित्य त्याचप्रमाणे वाहतूक खर्च करण्यात आला आहे. सर्व सामानाच्या मालवाहतूकी मध्ये विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे आणि माजी नगरसेवक नासीर शारवान यांचे विशेष सहकार्य लाभले.


 


                            मागील आठ दिवसांपासून या सर्व सामानाची पॅकिंग करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. यामध्ये गिरीश पवार,मिलिंद कदम,तेजस सावंत,राजेश दळवी, राजू सावंत, केदार सावंत,देवेंद्र सावंत,बळीराम तातोड,राजू चौधरी,अशपाक बढाणे,अख्तर खान,सीताराम कुंभार,प्रतुल सावंत,किरण पेमारे,नीरज यादव,आतिष ढेबे,तुषार जाबरे,गंधार चव्हाण,श्रीलेश कासुरडे,सिद्धांत चौधरी, मुजफ्फर डोंगरे,हर्ष शिंदे, इजाज डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.कोरोना संकटकाळात राज्यात कुठे नव्हे एवढ्या मोठया प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची जवळपास 35 ते 40 किलो वजनाची (किट्स) पुढील दोन ते अडीच महिने पुरेल इतकी मदत नागरिकांना उपलब्ध आहे.माथेरान मधील दिग्गज नेत्यांच्या पुढाकाराने नागरिकांना सलग तीन दिवसांत घरपोच करणे शक्य झाले आहे.त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.


 


 


 


 


 


 


 


फोटो ओळ 


 


मदत वाटप करताना कार्यकर्ते


 


छायः गणेश पवार