सूर्यमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष अशोक सुसगोहेर आणि मेहेरबाबा इराणी यांच्या पुढाकाराने अन्न - धान्य कीटचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये असलेल्या पुणे शहरातील जनतेचे आर्थिक स्तोत्र बंद असल्याने त्यांच्या अन्नधान्याच्या समस्या तीव्र होत आहेत. याची जाण ठेवून 18,  क्वीन्स गार्डन येथील सूर्यमुखी दत्त मंदिराच्या वतीने कॅन्टोन्मेंट वार्ड क्रमांक 1 मधील गरजू जनतेस सुखा शिधा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. हे किट कॅन्टोन्मेंट वार्ड क्रमांक 1  मधील रिक्षाचालक, मोलकरीन,  रोजंदारीवरील कामगार, गरजू कुटुंबीय यांना देण्यात आले. या किटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ,  तूर डाळ व रिफाइंड तेल या वस्तूंचा समावेश आहे. 
    तसेच कॅन्टोन्मेंट वार्ड क्रमांक 1 मध्ये औषध फवारणी करण्यात यावी याकरिता मंदिराचे अध्यक्ष अशोक सुसगोहेर यांनी पाठपुरावा केला असता कॅन्टोन्मेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वार्ड क्रमांक 1 मध्ये औषध फवारणी केली आहे. 
   कोरोणाच्या कठीण काळात संपूर्ण जनता सुरक्षित आपल्या घरी असताना. पोलीस, डॉक्टर,  आरोग्य कर्मचारी, कॅन्टोन्मेंट विभागातील अधिकारी, कर्मचारी हे मात्र आपल्या जीवाची परवा न करता आपले कार्य बजावत आहेत. या सर्वांचे मंदिराच्या वतीने आभार मानण्यात आले
       या कार्यात सूर्यमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष अशोक सुसगोहेर आणि मेहेरबाबा इराणी यांनी विशेष प्रयत्न केले अशी माहिती मंदिराच्या अध्यक्षांनी  दिली आहे.


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image