मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास  प्राधिकरण क्षेत्रांतून  दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास  प्राधिकरण क्षेत्रांतून  दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा* 


1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी)  आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार  संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. 


2️⃣ असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून  या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास  परवानगी नाही.


3️⃣ मात्र, या दोन्ही  प्राधिकरण क्षेत्रातून  महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.
  
4️⃣ अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-१९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 


5️⃣ कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image