मालिक राम ट्रस्टच्या वतीने गेल्या दीड महिन्यांपासून दररोज अन्नदान करण्यात येत आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेले दिड महिना लॉक डाऊनमध्ये असलेल्या विविध भागातील व झोपडपट्टीतील नागरिकांना मालिक राम ट्रस्टच्या वतीने गेल्या दीड महिन्यांपासून दररोज अन्नदान करण्यात येत आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेले दिड महिना संपूर्ण भारत देशातील जनता लॉकडाऊन मध्ये घरीच आहे. त्यातच पुणे शहर हे रेड झोन मध्ये असल्याने येथील जनता देखील गेले दीड महिना झाले घरातच आहे. अशावेळी हातावर पोट असणारे लोक आणि गरीब कष्टकरी वर्ग यांचे हाल होत आहेत. या जाणिवेतून मालिक राम ट्रस्टच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून दररोज पुणे कॅम्प,भोपळे चौक,मंगळवार पेठ,  औंध परिसर,सोपान बाग,रेस कोर्स,बी टी. कवडे रोड,हडपसर भागातील गरीब गरजू जनतेस अन्नदान करण्यात येत आहे. यामध्ये चपाती,भाजी,डाळ खिचडी देण्यात येत आहे. अन्नदानाचा हा उपक्रम  ३ मे २०२० पर्यंत दररोज सुरू राहणार आहे तसेच हे अन्नदान राष्ट्रीय भावनेच्या हेतूने व  देशभक्तीच्या प्रेरणेने करण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंग राजपाल यांनी दिली. अन्नदानाचे कार्य गुरुमहाराज  आशीर्वादाने होत असल्याचेहि अध्यक्षांनी सांगितले. 
      याकरिता मालिक राम ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंग राजपाल,  लाजपाल सिंग राजपाल,हरदीपसिंग  राजपाल , अमित सिंग राजपाल,रवींद्रकौर राजपाल हे विशेष परिश्रम घेत आहेत.