वादळी वाऱ्यात झालेल्या घर आणि दुकानांच्या दुरुस्तीसाठी हार्डवेअर आदी दुकानांना लॉक डाऊन मधून सूट द्यावी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वादळी वाऱ्यात झालेल्या घर आणि दुकानांच्या दुरुस्तीसाठी हार्डवेअर आदी दुकानांना लॉक डाऊन मधून सूट द्यावी

कर्जत,ता.3 गणेश पवार

                    वादळी वाऱ्यात पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्ती साठी पत्रे आदी हार्डवेअर मालाच्या दुकानाना लॉक डाऊन मधून सूट द्यावी जेणे करून ही दुकाने उघडल्यास पीडितांना तुटफुट झालेली घरे ,दुकाने दुरुस्त करता येईल अशी मागणी कर्जत राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उदय पाटील यांनी केली आहे

                           कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या वादळी वाऱ्यात कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला सावेळे ,कशेळे,कोठीबे,पाथरज, नांदगाव,जांबरुग येथील घरांची पडझड झाली.नावंढवाडी येथे एका घरावर झाड पडून घरत राहणारे व्यक्ती थोडक्यात बचावले आहेत,तर कशेळे,सावेळे,पाथरज या भागात घरावरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे घरांचे आणि दुकानाचे छत उडून गेले पावसाचे पाणी आत आल्याने घरातील सामान ,दुकानातील विक्रीचा साठा केलेला माल भिजून वाया गेला संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पुढील काही दिवसातही अवकाळी पावसाची हवामान विभागाने वर्तविली असल्याने ग्रामस्थांचे शेतकऱ्यांचे , दुकानदारांचे पावसामुळे होणारे अधिक नुकसान टाळण्यासाठी घर आणि दुकानाची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे तरी ज्या दुकानांमध्ये पत्रे तसेच अनु दुरुस्तीचे सामान मिळते अशा व्यावसायिकांना, दुकानाना लॉक डाऊन मधून सूट द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उदय पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.