कोरोनाशी लढण्यासाठी माथेरान नगरपरिषद खंबीर : प्रेरणा सावंत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाशी लढण्यासाठी माथेरान नगरपरिषद खंबीर : प्रेरणा सावंत

कर्जत,ता.11 गणेश पवार

               कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात वाढतो आहे. या संकटाचा नायनाट करण्यासाठी भारत देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेले माथेरानच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माथेरानचे प्रवेशद्वारच बंद करण्यात आले आहे. तसेच या संकटाला माथेरानपासून दूर ठेवण्यासाठी माथेरान नगरपरिषद प्रयत्न करीत असून नागरिकांच्या सहकार्याने या संकटाशी दोन हात करण्यासाठी नगरपरिषद खंबीर असल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले आहे. 

               माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी माथेरानमध्ये येणाऱ्या  पर्यटकांना बंदी घातली आहे. तर शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाच्या संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना विविध माध्यमातून देण्यात येत आहे.माथेरान नगरपरिषदेच्या रुग्णालयामध्ये येणार्य रुग्णांसाठी तात्काळ प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधन सामुग्री तयार ठेवण्यात आलेली आहे. यासह आवश्यक त्या प्राथमिक उपचारनंतर गरज भासल्यास पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी स्वछता हि महत्वाची असल्याने येथील नागरिकांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सॅनिटायझर,मास्क, इ. साहित्य पुरविण्यात आलेले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात जंतुनाशकाची फवारणी केली जात आहे.नगरपरिषदेने कम्युवनटी सेंटर,वनविभागाचे विश्रामगृह, भारतीय स्टेट बँकचे विश्रामगृह येथे विलगीकरण कक्ष देखील स्थापन केले आहेत.  माथेरान शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेिलेला असून येथे नागररकांची तपासणी करण्याकरिता एक वैद्यकीय पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे. शहरामध्ये कोणतेही विस्थापित कामगार, मजूर असल्याचा सर्वे करण्यात येत असून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याकरीता तांदूळ 10 क्विंटल (प्रती कुटुंब 5 किलो प्रमाणे) किराणा मालाचे साहित्य 200 किट (गोडेतेल 1किलो, मीठ 1 किलो, हळद 100 ग्राम, मसाला 100ग्राम, मिरची पावडर 100 ग्रॅम, साखर 1 किलो, चहा पावडर 250 ग्रॅम, बिस्कीट पुडा 1नग) शासनाकडून प्राप्त होणारे साहित्य सदर कामगार/मजूर यांना वाटप करणेत येणार आहे. तसेच माथेरान नगरपरिषदेने घोड्याना मोफत चारा पुरविणे, लाईट बिल, पाणी बिल माफ करणे, घरपट्टी मध्ये सवलत देणे इ. मागण्या तात्काळ मान्य होणेकरीता वरिष्ठ कायाालयाकडे पाठविलेले आहे.नगरपालिका हद्दीमध्ये एमएमआरडीए मार्फत रस्ते बांधणी पॉईंट सुशोभीकरण कामे सुरु करण्याबाबत पाठपुरवठा करून हि कामे सुरु केलेली आहेत. तसेच या कामांमध्ये स्थानिक नागरिकांना रोजंदारी उपलब्ध करून देण्याबाबत सुचना केलेल्या आहेत, त्यानुसार स्थावनकांना रोजगार उपलब्ध होत आहे. 

                सध्या इतर ठिकाणी कोरोनाचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याघरातील वयस्कर व्यक्ती लहान मुलांची अत्यंत जबाबदारीने काळजी घेणे आवश्यक आहे. माथेरान मधील सर्व नागररकांनी शासन व नगरपररषदेस मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे.समाज माध्यमावर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नका अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.आपल्या घरात किंवा आजूबाजूला कोणालाही ताप, खोकला, सदी इ. लक्षणे आढळल्यास तात्काळ नगरपरिषदेच्यारुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन जा अथवा त्याची माहिती प्रशासनास कळवा. माथेरान शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहण्याची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत राहणार आहे. नगरपरिषद आपल्या साथीने कोरोनाशी लढण्यास खंबीर आहे. मात्र तरीही नागररकांनी गर्दी करण्याचे टाळा.अशी माहिती देत आपणास कोणतीही अडचण अथवा सूचना करावयाची असल्यास तातडीनगरपरिषदेच्या 8691079850 / 8806784252 / 8888282758 या संपर्क क्रमांकावर करा असे आवाहन   माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी बापूराव भोई यांनी माथेरानमधील नागरिकांना केले आहे।.