प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम: एंजल ब्रोकिंग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम: एंजल ब्रोकिंग


मुंबई, १४ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा केली. या घोषणेचा बुधवारी भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी५० च्या दोन दिवसांच्या नुकसानीला ब्रेक लागला. निफ्टी५० १८७.०० अंकांची म्हणजेच २.०३ टक्क्यांची वाढ घेत ९,३८३.५५ अंकांवर स्थिरावला. तर ३०-शेअर सेन्सेक्स ६३७.४९ अंक अर्थात २.०३% ची वृद्धी घेत ३२,००८.६१ अंकांवर थांबला. 


ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास १६३३ शेअर्सनी वृद्धी नोंदवली. तर ७२३ शेअर्सनी नुकसान दर्शवले व १६९ शेअर्स स्थिर राहिले. बाजाराची रॅली बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपसोबत आली. त्यांनी अनुक्रमे १.४९% आणि १.९७% ची वृद्धी दर्शवली.


बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ५.०८ टक्क्यांची वाढ घेणारा सर्वात मोठा सेक्टोरल गेनर ठरला. सरकारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये २३.६७ टक्क्यांची वृद्धी दिसली. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ८.४२ टक्क्यांनी वाढून ६५.७० रुपयांवर बंद झाला. फार्मा आणि एफएमसीजी वगळता इतर क्षेत्रांचे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले. बँक निफ्टीने ४ टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यासह आयटी, ऑटो, धातू, रसायन, उत्खनन, इन्फ्रा आणि ऊर्जा क्षेत्रातही वृद्धी घेतली.


इन्फ्रास्ट्रक्चरने स्थैर्य दिले:


इन्फ्रा शेअर्सनी ट्रेडिंगच्या उद्देशांसाठी बंद होईपर्यंत शेअर बाजार स्थिर ठेवण्यात यश मिळवले. लार्सन ट्रुबो लिमिटेड निफ्टीच्या प्रमुख इन्फ्रा ब्रँडपैकी एक असून यामुळे बुधवारी याच्या प्रदर्शनात सुधारणा झाली. एलअँडटी शेअरच्या किंमतीत ५१.२० रुपये किंवा ६.२८ टक्क्यांची वृद्धी दिसून आली व तो ८६६.०० वर बंद झाला.


बँकिंग स्टॉक्सने पुन्हा वेग पकडला:


बँक निफ्टी १९,६४.९५ अंकांवर बंद झाले म्हणजेच ७७२.१० अंकांची वृद्धी झाली. बँकिंग क्षेत्रात १२ सर्वात मोठ्या कॅपिटलाइज्ड स्टॉक्सचे चित्रण करणारे बँक निफ्टी हे भारतीय बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय प्रदर्शन दर्शवते. यात प्रामुख्याने अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकांसारख्या स्टॉक्सचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा शेअर ४१३.५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच २७.१० रुपये किंवा ७.०१% ची वृद्धी दिसली. शेअरने इंट्रा डे गुंतवणुकीसाठीही नफा कमावण्याचे काम केले. हा ३९९.६० रुपयांच्या निम्न स्तरावर सुरू झाला आणि त्याने ४१६.४५ रुपयांच्या उच्च स्थानाला स्पर्श केला. यासह आयसीआयसीआय बँकेनेही सकारात्मक संकेत दिले. तो ३३७.२० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच १६.० किंवा ४.९८ रुपयांची वृद्धी घेतली.