औरंगाबाद रेल्वेमार्गावरील मजूरांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त*_

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


_*उपमुख्यमंत्री कार्यालय,*_
_*मंत्रालय, मुंबई,*_
दि. 8 मे 2020_*औरंगाबाद रेल्वेमार्गावरील मजूरांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त*_
*परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार;जीव धोक्यात घालून कुणीही असुरक्षित प्रवास करु नये*
                         *-उपमुख्यमंत्री अजित पवार*
           मुंबई, दि. 8 :-  जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेरुळांवर झोपलेल्या 16 जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांची घरी परतण्याची अधिरता, तळमळ, चाललेली पायपीट मन विषण्ण करणारी आहे. परप्रांतीय मजूरबांधवांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. केंद्र व सबंधीत राज्यांच्या सहकार्यानं सर्व मजूरांना त्यांच्या राज्यांत पाठविण्यात येत आहे, परंतु आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा, जीव धोक्यात घालून असुरक्षीत प्रवास करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
               औरंगाबादनजिक रेल्वेरुळावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रानं गेले दिड महिने राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजुर बांधवांच्या अन्नपाणी, निवारा, वैद्यकीय उपचारांची सोय केली, ती व्यवस्था आजही सुरु आहे, यापुढेही सुरु राहील. महाराष्ट्रात काम करणाऱ्या आमच्या परप्रांतीय मजूरबांधवांची राज्य सरकार काळजी घेत असताना काहींचा असा अपघाती मृत्यु होणं दुर्दैवी, क्लेषदायक आहे. महाराष्ट्रात अडकलेल्या व आपापल्या राज्यात, घरी जावू इच्छिणाऱ्या मजूर बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. केंद्र आणि संबंधीत राज्यांच्या सहकार्यानं ही जबाबदारी पार पाडली जात आहे. टप्प्याटप्याने सर्वांना आपापल्या राज्यात जाता येणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येईल. परंतु, त्यासाठी घाई करु नये. ही घाई जीवघेणी ठरु शकते. मजूर बांधवांनी जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, कोरोनाच्या संकटावर आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
0000000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या