कोरोनाच्या काळात सह्याद्री सेवा संघांचे अध्यक्ष अक्षय कोठावळे यांच्याकडून गरोदर महिलेस केलेल्या  सहकार्याने माणुसकीचे दर्शन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाच्या काळात सह्याद्री सेवा संघांचे अध्यक्ष अक्षय कोठावळे यांच्याकडून गरोदर महिलेस केलेल्या  सहकार्याने माणुसकीचे दर्शन


                 सह्याद्री सेवा संघाचे  अध्यक्ष अक्षय कोठावळे हे अन्नदान करून घरी येत असताना कमला नेहरू हॉस्पिटल जवळून जात असताना दोन भगिनी चालत चालल्या होत्या , त्यांनी  जाताना वाटेत त्यांना विचारलं की कुठे चालले आहेत यावर त्यांनी सांगितले कि ते आंबेडकर नगर मार्केट यार्ड येथे पायी चालले  आहे,त्यात अर्चना सोमनाथ दाभाडे या भगिनी ७ महिन्यांच्या गरोदर होत्या, त्यांच्या घरून येताना सुद्धा ते चालत आल्या होत्या
 सौं.अर्चना दाभाडे यांच्या नाजूक परिस्थितीचा विचार करून अक्षय कोठावळे यांनी त्यांना मदत करायचे ठरवले,आणि अनेक रस्ते लॉक डाउन मुळे बंद असताना लांबच्या अंतराने त्यांना सुखरूप, विनामूल्य त्यांच्या घरापर्यंत काळजीपूर्वक  सोडले.  
     गेले दोन महिने लॉकडाउनमध्ये असलेल्या गरजू जनतेस दररोज स्वतःच्या रिक्षामध्ये अन्न,मास्क, सैनीटायझर सुका शिधाचे वाटप करत असताना माननीय अक्षय कोठावळे हे रस्त्यावरील गरजू वाटेकरी व्यक्तींची देखील या प्रकारे मदत करीत आहेत.