नांदेड चे ३८ मजूर पुण्याहून रवाना*  *जिल्हाधिकारी नवल किशोर राम*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*नांदेड चे ३८ मजूर पुण्याहून रवाना*


 *जिल्हाधिकारी नवल किशोर राम*


पुणे, दि.८: लॉक डाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधुन आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.


     या मजुरांना पाठविण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोविड-१९ च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.


त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉक डाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरु असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली, तथापि, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, आज या मजुरांना रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.


या ३८ प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी श्री. पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले.


मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.


000000


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image