पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रति,
आदरणीय संजोगभाऊ वाघिरे पाटील
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
पिंपरी चिंचवड शहर
सर्वप्रथम,अभिनंदन भाऊ !!!
आज आपल्या अध्यक्ष पदाला तब्बल पाच वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या पाच वर्षात पक्ष सत्तेत नसताना आपण बिकट परिस्थितीत आव्हानांना कसे निश्चयाने, संयमाने व एकनिष्ठेने सामोरे गेलात याला माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते साक्षीदार आहेत. आपल्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचे मेळावे झाले. हल्लाबोल यात्रा, शिवस्वराज्य यात्रा, महाआरोग्य शिबीर, इ अनेक कार्यक्रमांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम आणि सभा कशा असाव्यात याचे मापदंड घालून दिलेत.
, मार्गदर्शन केले. ज्यामुळे समाजात आणि राजकारणात आमचे स्थान निर्माण झाले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी काय असतात याची कायमच जाण आपण ठेवता. अगदी लहानातील लहान कार्यकर्त्याला देखील सन्मानाने वागवता. कधीही कोणत्याच कार्यकर्त्यावर गेल्या पाच वर्षात तुम्हाला चिडलेले मी पाहिले नाही. सगळ्यांना सोबत घेऊन कोणालाही नाराज न करण्याचा प्रयत्न अभावानेच राजकारणात केला जातो कारण राजकीय स्पर्धेचे मुळचं इतरांना मागे टाकण्यासाठी विश्वासघात, असूया, राग, संधीसाधुपणा यामध्येच मानलं जातं. आपण मात्र याला अपवाद आहात.
आपल्या राजकीय सहयोग्याबद्दल वा शत्रूबद्दल तुम्ही वैयक्तिक राग- लोभ, असूया ठेवलेली मी कधी पहिली नाही. एखाद्या कार्यकर्त्याने केलेल्या कामाचे क्रेडिट त्याला पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडून मिळालेच पाहिजे यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहत आला आहात. नाहीतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर मोठे होत नंतर त्यांच्याच राजकीय मुळावर उठत त्यांना नेस्तनाबूत करण्याची परंपरा पिंपरी चिंचवड शहराला नवी नाही. आपण मात्र अजात शत्रू बनून राहिला आहात. राजकारणातला हा निर्मळपणा आपल्यासारख्या काही लोकांमुळे टिकून आहे आणि म्हणूनच की काय आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये अजूनही राजकारणात काम करण्याची उर्मी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा यांच्यावरील आपली निष्ठा अविचलीत आहे आणि आपल्याकडे बघून माझ्या सारखे असंख्य तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, साहेब आणि दादा यांच्याप्रती असलेल्या निष्ठतेच्या प्रती स्थितप्रज्ञ आहेत....
आपणास मनापासून खूप खूप शुभेच्छा....
आपला ,
सुनिल विजय गव्हाणे
शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)