आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रूग्णालयास हेल्थ ए टी एम मशीन भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 
 आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रूग्णालयास हेल्थ ए टी एम मशीन भेट
          कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनंतराव गाडगीळ यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयास प्रत्येकी तीन लाख रुपयाचे हेल्थ ए टी एम मशीन भेट दिले. या हेल्थ ए टी एम मशीनद्वारे एकाच वेळी रक्तदाब,ठोके यासारख्या 23 तपासण्याकरता येतात. सदर दोन्ही मशीन या केंद्रीय आरोग्य खात्याची मान्यता असलेल्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या कंपनीच्या आहेत. 
        गेल्या तीन वर्षात माननीय अनंतराव गाडगीळ यांनी त्यांच्या आमदार निधीतून सव्वा कोटीहून अधिक रकमेची वैद्यकीय सामुग्री पुण्यातील विविध सार्वजनिक रुग्णालयास दिली आहे. तसेच शहराच्या पूर्व भागातील एका सार्वजनिक रुग्णालयात कोरोणाच्या उपचारासंदर्भात तक्रारी येताच गाडगीळांनी याबाबत हस्तक्षेप केला त्यामुळे कोरोना रुग्णांना त्वरित योग्य ती  मदत मिळाली व रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले.त्या रुग्णांनी  एस एम एस दवारे  गाडगीळांचे आभार मानले आहेत
 फेब्रुवारी 2020 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी कोरोनाच्या उपचाराकरिता दहा लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. दहा लाख रुपयाच्या आमदार निधीची किंमत 25 मार्चच्या जी.आर.ने वाढवून 50 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
      माननीय आमदार अनंतराव गाडगीळ यांनी दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये मध्ये सातत्याने केलेल्या आरोग्य कार्यामुळे व नुकत्याच दिलेल्या दोन  हेल्थ ए टी एम मशीन मुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाला मोठी मदत होत आहे.                  पुण्याचा हिन्दुस्थान अॅंटीबायोटीक कंपनीने बनविलेले रुग्णाचा  एकाचवेळी २३ चाचण्या घेणारे “क्लिनिक आॅन कलाउड “ (Clinic on Cloud-Health ATM  ) हे  अत्याधूनिक ३ लाखाचे मशिन आमदार अनंतराव गाडगीळ यांनी आपल्या आमदार फंडातून दिले.