अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना लॉक डाऊनमध्ये असलेल्या सुरक्षारक्षक,बांधकाम मजूर,रिक्षाचालक, मोलकरीन,  रोजंदारीवरील कामगार व गरजू कुटुंबाना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

        कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण भारतातच वाढत आहे त्यातच पुणे शहर आणि मुंबई ही महानगरेही रेड झोन मध्ये असल्याने येथील जनता गेले दीड महिना लॉकडाऊन मध्ये आहे, या लॉकडाऊन मध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, बांधकाम मजूर,  रिक्षाचालक,मोलकरिन,  रोजंदारीवरील कामगार यांचे हाल होत आहे. याची जाण ठेवून आज गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त जुना  म्हाडा,बिराजदार वस्ती, बी. टी. कवडे रोड, सुरक्षा नगर,हिंगणे मळा, भीमनगर येथील वरील सर्व प्रकारातील कामगारांना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

   या किटमध्ये तांदूळ, गहू, साखर,तूर डाळ,खाद्यतेल, चहा पावडर,मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

 अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे व पार्टीचे महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उज्वलाताई रमेश साळवे यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प वाहण्यात आली . आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत तावरे, महाराष्ट्र  प्रदेश सचिव शकुंतला वाघमारे,   पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोमरे,महिला आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष शीला उपाते या सर्वांनी मिळून सामुदायिक वंदना केली या वंदने मध्ये त्रिशरन पंचशील,बुद्ध पूजा, भीम स्तुती, भीमस्मरण करण्यात आले आणि मग किटचे वाटप करण्यात आले.

 जीवनावश्यक किटचे वाटपाचा उपक्रम दिनांक 15/05/2020 पर्यंत चालणार आहे अशी माहिती पार्टीच्या अध्यक्षानी दिली.