मूल्याशिवाय शिक्षण हे सुगंध नसलेल्या फुलासारखे एमआयटी डब्ल्यूपीयूत आयोजित वेबिनारमध्ये तज्ज्ञांना सूर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 30 मे 2020


 


 मूल्याशिवाय शिक्षण हे सुगंध नसलेल्या फुलासारखे


एमआयटी डब्ल्यूपीयूत आयोजित वेबिनारमध्ये तज्ज्ञांना सूर


 


पुणे,दिः30 मेः “ चांगल्या आचरणाचे, आत्मविश्वासाचे आणि उच्च मूल्यांचे गुण आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना सामाजात महत्वपूर्ण स्थान मिळेल. मूल्या शिवाय शिक्षण हे सुगंध नसलेल्या फुलासारखे आहे. करिअर बिल्डिंग इतकेच चरित्रनिर्मितीही तितकीच महत्वाची आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. जीवनात एक चांगले चरित्र म्हणजे व्यक्तीच्या आत्म प्राप्तीस घेऊन जाणारी एक चांगली गोष्ट आहे.” असा सूर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आयोजित वेबिनार सेमिनारमध्ये निघाला.


‘ पोस्ट कोविड वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पदधतीचे महत्व ’ या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे, महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी यांनी विचार मांडले. गुणवतत्तपूर्ण


डॉ. विजय भटकर म्हणाले, “ 1990 च्या दशकात बीएसएनएल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कनेक्टिविटी आणि यासारख्या माध्यमातून लोकांना शिक्षण दिले जात होते. 2020 मध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्यामध्ये दूरसंचार, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या गोष्टीचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल झाले. त्यामुळे शिक्षण पद्धती परिवर्तन येऊन ऑनलाईन पद्धतीचा वापर सुरू झाला. पुढील काळात याच शिक्षण पद्धतीचा वापर होईल. त्यामुळे विद्यापिठांनी व शिक्षणसंस्थांनी याची तयार आतापासून करावी. प्रॅक्टिकल लाइफ, डिजिटल माइंड व परमार्थीक जीवन या गोष्टींचा अंतर्भाव शिक्षण पद्धतीत असणे गरजेचे आहे. माझ्या जीवनाचा उद्देश काय हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. जीवनाला अध्यात्माचा स्पर्श असणे आवश्यक आहे. या पुढील काळात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्धतीचाच उपयोग होणार आहे.”  


डॉ. संजय धांडे म्हणाले,“ गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली ही वर्तमान काळाची गरज आहे. कारण सध्याच्या काळातील समाजात मूल्य प्रणालीत लक्षणीय बिघाड होतांना दिसत आहे. देशात आज क्लासिकल, प्रोफेशनल, समाज केंद्रीत, वैयक्तीक मानसशास्त्र, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीचे पालन प्रत्येक शिक्षण संस्थेने करणे गरजेचे आहे. बर्‍याच ठिकाण रॅगिंग व लिंग भेदसारखे प्रकार घडतांना दिसतात. ते थांबवावे लागेल. तसेच शिक्षण पद्धती ही पारदर्शी असावी.”


“शिक्षण हे सामाजिक, राष्ट्रीय सोशल सर्वीसचे असावे तसेच विद्यार्थ्यांना पॅरा मेडिकल, पॅरा पोलिस, सुरक्षे संदर्भातील माहिती व कायदे विषयकाचे ज्ञान देणेही गरजेचेच आहे. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण, एथिक वैल्यू, सामाजिक मूल्य व जागतिक दर्जाच्या सामाजिक मुल्यांचे शिक्षण व जागतिक व्यावसायिककरणाचे शिक्षणाची आवश्यकता आहे.”


डॉ. अभय वाघ म्हणाले,“ गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये पिरॅमिड अतिशय महत्वाचा आहे. या पिरॅमिडमध्ये 60 टक्के बुध्दांकाचे असतात, 25 टक्के विद्यार्थी हे भावनांक असलेले आणि उर्वरित 15 टक्के विद्यार्थी हे आध्यात्मांक असतात. त्यामुळे देशातील शैक्षणिक पद्धतीत या पिरॅमिडचा वापर करणे गरजचे आहे. तसेच, ग्रामिण व शहरी क्षेत्रातील म्हणजेच चांदा ते बांदा पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या शिक्षण प्रणालीत समावेश होणे गरजेचे आहे.


या देशात जशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था, देशाचा जीडीपी असतो तसेच देशाच्या शैक्षिणक धोरणाचाही आराखडा असणे गरजेचे आहे.”


डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ सध्याच्या काळातील समाजात मूल्य प्रणालीत लक्षणीय बिघाड होतांना दिसत आहे. अशावेळेस गोंधळलेल्या मनात मूल्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि मूल्यवान शक्तिशाली बनविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी नव्या पिढीला मूल्य आधारित आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशा वेळेस देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धती व आध्यात्म महत्वाचे आहे. शिस्त आणि चारित्र्य या गोष्टी विद्यार्थीदशेत महत्वाचे आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून आत्मविकास आणि मनाचा विकास या दोन गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे.”


“वर्तमानकाळात कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला लॉकडाउन केले आहे. अशा वेळेस अध्यात्माच्या आधारे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे मनोबल वाढवावे.. सृष्टीवरील प्रत्येक नागरिकाने अध्यात्माच्या मार्गावर चालावे. शांतीपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी सर्वांना अध्यात्माचा आधार घ्यावा लागेल.”


यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे आणि सीईओ प्रविण पाटील हे उपस्थित होते. या वेबिनार सेमिनारमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यातील शेकडो जिज्ञासूंनी सहभाग घेतला होतो. सेमिनार प्रश्नोत्तर झाले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचेण कुलगुरू डॉ. एन.टी.राव यांनी आभार मानले.


 


 


 


जनसंपर्क विभाग,


माईर्स एमआईटी, पुणे


 


000000