ओकिनावाद्वारे कार्यसंचालनाची सुरूवात ~ २५ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीसह उत्पादनकार्याचीही केली सुरूवात ~

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


ओकिनावाद्वारे कार्यसंचालनाची सुरूवात


~ २५ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीसह उत्पादनकार्याचीही केली सुरूवात ~


मुंबई, ११ मे २०२०: ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर भर असलेल्या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आज त्यांचे कॉर्पोरेट कार्यालय व उत्पादन केंद्रामध्‍ये २५ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीसह कार्यसंचालनांना पुन्हा सुरूवात केल्याची घोषणा केली. सरकारने नियमांमध्ये आणलेल्या शिथिलतेसह ओकिनावाने सांगितले आहे की, ते व्यवसाय कार्यसंचालनांना सुरूवात करत असताना कार्यस्थळ, उत्पादन केंद्र व डिलरशिप नेटवर्क्समध्ये सुरक्षितताविषयक नियमांचे पालन करतील. ब्रॅण्‍डने २५ टक्के कर्मचारी उपस्थितीसह कार्यसंचालन सुरू करणा-या त्यांच्या डिलरशिप नेटवर्कसाठी नियमावली जारी केली आहे. सोबतच उत्पादन केंद्रामधील असेम्ब्लीमधून उत्पादने पाठवण्‍यापूर्वी सॅनिटाईज करण्‍यात येतील आणि डि‍लर भागीदार उत्पादने मिळाल्यानंतर सॅनिटाईज करतील.


ग्राहक व डिलर्सच्या सुरक्षिततेच्या खात्रीसाठी ओकिनावाच्या सर्व डिलरशिप्समध्ये नियमांनुसार योग्य थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच ऑरेंज व ग्रीन विभागांमधील पुन्हा सुरू होणा-या सर्व डिलरशिप्सचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. कॉर्पोरेट कार्यालयामध्ये ओकिनावा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत असल्याच्या खात्री‍साठी कर्मचा-यांच्या आसन व्यवस्थेबाबत खबरदारीचे उपाय घेत आहे. सरकारी नियमांचे पालन करत ब्रॅण्डने कर्मचा-यांना मास्क्स व इतर संरक्षणात्मक उपकरणांचा पुरवठा करण्यासोबत आरोग्य सेतू मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे अनिवार्य केले आहे.


ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा यांनी सांगितले की, 'संपूर्ण देशासाठी या दुर्दैवी स्थितीमध्ये ओकिनावा एक जबाबदार ब्रॅण्ड म्हणून आपले कर्मचारी, डिलर भागीदार व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संभाव्य उपाय हाती घेत आहे. सरकारसोबत आपण सहयोगाने काम करत या आव्हानात्मक स्थितीवर मात करण्याची गरज आहे. सरकारने आर्थिक व्यवहारांवर शिथिलतेची घोषणा केली असताना आम्ही सर्व खबरदारी घेत हळूहळू व्यवसाय कार्यसंचालन पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन