महाविकास आघाडी सरकारची करोनाशी लढाई कशी चालू आहे तुम्ही एकदा बघाच -

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


महाविकास आघाडी सरकारची करोनाशी लढाई कशी चालू आहे तुम्ही एकदा बघाच -


★ सात वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपासून काम नाही, आणि पोस्टिंग नाही! बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ पोलिस दलात रिस्पेक्ट व दबदबा दोन्ही असलेले आणि जे २६/११ च्या घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून लढले होते असे सदानंद दाते, गेले २ महिने झाले दिल्लीतील पोस्टिंग संपवून महाराष्ट्रात आलेत. आणि, आल्यापासून रिकामेच बसलेत. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ अनेक महामंडळे आणि खात्यात प्रमुख अधिकाऱ्यांना ना कामं दिलेत, ना 'धंदा' चालू आहे. फुल्लटू वैतागलेत. कमी पगारात महिना कसा काढायचा असा प्रश्न मंत्र्यांना विचारत आहेत. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ अजोय मेहता आणि प्रवीण परदेशी यांचे काल शाब्दिक युद्ध झाले आणि संध्याकाळी परदेशी यांची विकेट! बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ नाना पटोले यांनी अजोय मेहता यांना टार्गेट केलंय, आपली नाराजी मेहता यांना तोंडावर 'संस्कृत' चा मुक्त वापर करत व्यक्त केली आहे. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ जैस्वाल, गगराणी, भीडे, सिंघल, जलोटा, नंदकुमार, पाटणे यांच्या सारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांना भोंगा वाजला की कोमट पाणी पिऊन गाण्यांच्या भेंड्या खेळण्याव्यतिरिक्त काही कामं नाहीत! बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ परदेशी यांना गगराणी पाहिजे होते. ते कळताच गगराणी यांना 'ह्या युद्धात अतिशय महत्त्वाच्या' असलेल्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) धाडण्यात आलं.. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ अजून एक हुशार आणि धडाडीचे अधिकारी नितीन करीर यांना परप्रांतीयांना गावी पाठवायचा कामात लावलंय. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ MSRDC, MIDC, MMRDA आणि CIDCO यात नेमणूक झालेले IAS अधिकारी कुठलीही जबाबदारी दिली नसल्याने रिकामे बसलेत. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ राज्यातील 350 IAS अधिकाऱ्यांपैकी 150 IAS अधिकाऱ्यांना कोविडशी संबंधित कामांपासून पुर्णपणे दूर ठेवण्यात आले आहे. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ जास्तीतजास्त कामं वाटायची, त्यावर निर्णय घ्यायची आणि संबंधित बिलांवर सह्या करायची पावर मुख्य सचिव अजोय मेहता यांचे खास इकबाल चहल, आभा सिंह, मनोज सौनिक आणि राजीव मित्तल (सगळे अमराठी अधिकारी) यांच्याकडे देण्यात आली आहे. बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ आरोग्यमंत्री टोपे यांच्या विभागाचे सचिव प्रदीप व्यास आणि वैद्यकीय शिक्षण सचिव अमित देशमुख यांचे सचिव संजय मुखर्जी (हे दोघे पण अमराठी) यांनी पत्रकारांना CSR मधून राज्य सरकारला आलेल्या पैशांतून काय केलं विचारण्यावर बंदी घातली आहे! बाकी सगळं ठीक आहे..🙏


★ राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्हाधिकारी (हे सगळे IAS आहेत) राज्य सरकारवर वैतागलेत. रोज नवनवीन आदेश काढतात मंत्रालयातून पण अंमलबजावणी करण्यात अडचण येताना स्पष्टीकरण मागितलं तर मंत्रालयात बसलेले मोठे 'बाबू' अंगावर येतात!


बाकी सगळं ठीक आहे..🙏


- वेद कुमार