पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ममदापुर ग्रामपंचायतीत पाणीबाणी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो तर ग्रामपंचायतीच्या बिल्डरसाठी पायघड्या, सदस्यांचा आरोप
कर्जत दि.9 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील ममदापुर ग्रामपंचायत हद्दीत तशी पाण्याची समस्या गंभीर आहे. गावातील पाणी टंचाईची भीषणता लक्ष्यात घेता या ग्रामपंचायत हद्दीत उभ्या राहणाऱ्या मोठमोठ्या इमारतींच्या बिल्डर लॉबीला सध्या पाणी कनेक्शन देवू नये असे ग्रामपंच्यातच्या सर्व सदस्य,सरपंच यांच्या एकमताने ठराव घेतला गेला होता. मात्र तरीही या ठरावाला फाटा देत केवळ आर्थिक हव्यासा पोटी परस्पर ग्रामपंचायतीला हाताशी धरून काही नेते मंडळी या बिल्डर लॉबी कडून आर्थिक व्यवहार करीत असून बिल्डरांना पाणी देत असल्याचा आरोप नेरळ ममंदापूर ग्रामपंचायतीतील काही सदस्य करत आहेत. या प्रकारामुळे ग्रामपंचायत मधील वातावरण तापले असून या ग्रामपंचायतीत पाणीबाणी उद्भवली आहे
ममदापुर ग्रामपंचाती हद्दीतील एका बिल्डरने ७ मे च्या मध्यरात्री आपल्या डेक्कन होम्स या इमारतीला पाण्याची पाईपलाईनचे काम करण्यास सुरवात केली होती. अंधारात सुरु असलेला हा खेळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थितीत राहून ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आणला. व सुरु असलेले काम रोखले. त्यावरून ग्रामस्थ व बिल्डर यांच्यात बाचाबाची देखील झाली. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला रस्ता देखील कोणतीही परवानगी न घेता संबंधित बिल्डरने फोडला आहे. मुळात ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची भीषण टंचाई असताना देखील बिल्डरला पाणी कसे पुरवले जाते असा प्रश्न ग्रामपंचात सदस्यां आरती सुनील सोनावळे व कल्पना डांगरे यांनी उपस्थित केला आहे. तर या बाचाबाचीवेळी ग्रामपंचातीच्या प्रशासनासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे बिल्डर याने उघड केले त्यामुळे ममदापुर ग्रामपंचातीत वातावरण तापले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला सदस्यांनी धारेवर धरले आहे. दरम्यान याप्रकाराबाबत ममदापुर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना विचारणा केली असता या आरोपांच त्यांनी खडनं केले असून संबंधित बिल्डर विरोधात आपण लवकरच कारवाई करणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.
एकूणच वाढत्या शहरीकरनाची संख्या लक्ष्यात घेता मनुष्याची मुख्य गरज असलेल्या पाण्यासाठी उपाय योजना आखल्या गेल्या पाहिजेत. मात्र ममदापूरमध्ये हे होताना दिसत नाहीये स्वतःची हक्काची पाणी योजना पूर्ण होत नसल्याने गावासह वाडी आणि आता येथे उभ्या राहणाऱ्या इमारतींसाठी सुद्धा पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर या प्रकरणात ममदापुर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मागे उभी राहते कि बिल्डरलॉबीच्या हे पाहणे औतुसक्याचे ठरणार आहे.