प्रभावी उपाययोजनासह गर्दी नियंत्रण करणे महत्वाचे", -मा,मुरलीधर मोहोळ, महापौर,पुणे,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
०२/०५/२०२०
"प्रभावी उपाययोजनासह गर्दी नियंत्रण करणे महत्वाचे",
-मा,मुरलीधर मोहोळ,
महापौर,पुणे,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव उपाययोजना अंतर्गत पुणे मनपाच्या वतीने विविध यशस्वी उपाययोजना करण्यात येत आहेत,तथापि दैनंदिन परिस्थिती व आकडेवारी पहाता उपाययोजनांसह दाट लोकवस्ती व झोपडपट्टीच्या ठिकाणी,रेड झोन परिसरात जलदरीत्या उपाययोजना व या भागातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात मनपाने उपलब्ध करून दिलेल्या मनपा शाळा व अन्य ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणीप्रसंगी सांगितले,
आज पाटील इस्टेट,कामगार पुतळा,ताडीवाला रस्ता, लक्ष्मीनगर,येरवडा,परिसरातील पाहणी करण्यात आली,
पाटील इस्टेट,व कामगार पुतळा येथे पाहणीप्रसंगी स्थानिक आमदार व मा,सभासद सिद्धार्थ शिरोळे,मा,सभासद आदित्य माळवे,मा,सोनाली लांडगे,मा,स्वाती लोखंडे,तसेच मा,उपमहापौर सौ,सरस्वती शेंडगे,क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे उपस्थित होते,
संपूर्ण पाहणीप्रसंगी मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,साखर आयुक्त सौरभ राव,सहकार आयुक्त अनिल कवडे,पशुसंवर्धन आयुक्त सचिनद्र प्रतापसिंग,भूजल विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त मा,रुबल अगरवाल,तसेच सहमनपा आयुक्त ज्ञानेश्वर मोलक,विजय दहीभाते,उपायुक्त अविनाश सकपाळ,नितीन उदास,किशोरी शिंदे,श्री,इनामदार व ताडीवाला रस्ता येथील पाहणी प्रसंगी क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे,सहपोलिस आयुक्त डॉ,संजय शिंदे,सहाययक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ व अन्य पोलीस अधिकारी,
लक्ष्मीनगर,येरवडा येथील पाहणीप्रसंगी मा,उपमहापौर सौ,सरस्वती शेंडगे,मा,सभासद डॉ,सिद्धार्थ धेंडे,मा,अविनाश साळवे,मा,सौ,श्वेता चव्हाण,क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी,डॉ,माया लोहार,डॉ,वैशाली जाधव,क्षेत्रीय अधिकारी विजय लांडगे,श्रीशेठ चव्हाण,तसेच सहपोलिस आयुक्त सुनील फुलारी, वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख,व अन्य मनपा अधिकारी,पोलीस अधिकारी,भारतीय जैन संघटनेचे डॉ,विवेक राजपूत व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते,
पाहणीप्रसंगी मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित अधिकारी व स्थानिक मा,सभासद,व अधिकारी,कार्यकर्ते यांचेशी चर्चा केली,
मुखत्वे करून दाट वस्ती भागातील व झोपडपट्टी भागातील गर्दीवर नियंत्रण उपाययोजना करतानाच तेथील सार्वजनिक स्वच्छतागृह दुर्गंधीमुक्त ठेवण्याबरोबरच सातत्याने स्वछ रहातील त्यादृष्टीने नियोजन केले जावे,
सर्वेक्षणावेळी नागरिकांची माहिती प्राप्त झालेनंतर त्यानुसार त्वरित नियोजन करणे,घराजवळच्या केंद्रात पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी,
स्वाब तपासणी,तपासणी नंतर,तपासणी अहवाल आलेनंतर त्यानुसार त्वरित नियोजन करण्यात यावे,
सर्वेक्षण कर्मचारी,आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षा साधने,मास्क,किट्स,हँडवाश, हॅण्डग्लोज,औषधे,व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात,
परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसह तेथील कडी,कोयनडे यावर व परिसरात निर्जंतुकीकरण करणे,
आवश्यक मनुष्यबळ,साधनसामुग्री यात वाढ करणे,
मोबाइल टॉयलेट संख्या वाढविण्याबरोबरच लगतच्या हँडवाश संख्याही वाढ करणे,
परिसरातील गर्दीवर नियंत्रणाकरिता तातडीने उपाययोजना करणे,
याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱयांना आदेश दिले,
लक्ष्मीनगर येरवडा येथील पाहणीप्रसंगी मा,सभासद डॉ,सिद्धार्थ धेंडे,मा,अविनाश साळवे,मा,सौ,श्वेता चव्हाण, डॉ,विवेक राजपूत श्रीशेठ चव्हाण,यांनी याप्रसंगी येथील नागरिक व रुग्ण या यांच्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली,
--संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
०२/०५/२०२०,