श्री. संजीव जयस्‍वाल यांनी  ‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा पदभार स्‍वीकारला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बृहन्मुंबई महानगरपालिका
जनसंपर्क विभाग 
क्रमांक – पीआरओ/२५/पी, दिनांक – ०९.०५.२०२०
कृपया त्वरित प्रसिद्धीसाठी 
 श्री. संजीव जयस्‍वाल यांनी 
‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा पदभार स्‍वीकारला


बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्तपदी श्री. संजीव जयस्‍वाल यांनी आज (दिनांक ०९ मे, २०२०) पदभार स्वीकारला. यावेळी सह आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने त्‍यांचे स्‍वागत केले. 


श्री. संजीव जयस्‍वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्‍या तुकडीचे अधिकारी असून त्‍यांनीही आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक व तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, मा. उप मुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्‍हणून श्री. जयस्‍वाल यांनी काम पाहिले आहे. त्‍यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.  
***


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image