अक्षय कोठावळे यांच्या कडून हजारो गरजू नागरिकांना अन्नदान , N-95 मास्क ,  सैनीटायझर व अन्नधान्याचे किट वाटप. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अक्षय कोठावळे यांच्या कडून हजारो गरजू नागरिकांना अन्नदान , N-95 मास्क ,  सैनीटायझर व अन्नधान्याचे किट वाटप.

         

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश गेले 2 महिने लॉकडाउन मध्ये आहे. या लॉकडाउनमध्ये सर्व जनता घरातच आहे.अर्थव्यवस्था पूर्णपणे बंद झाली असून लाखो जनतेचे अतोनात हाल होत आहेत.याची जाण सह्याद्री सेवा संघाने ठेवली व पुणे शहरामध्ये अडकून पडलेले व छोटे व्यवसाय करून संसार चालवणाऱ्या मजूर, शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी, बेघर नागरिक, अपंग नागरिक, अंध, वृद्ध, अशा गरजवंतांना सह्याद्री सेवा संघाच्या वतीने अन्नदान ,N 95 मास्क , सैनेटायझर व अन्नधान्याचे किट  वाटप करण्यात येत आहे. गेले दोन महिने प्रत्येक दिवशी गरजवंतना हा दानयज्ञ अविरत सुरु आहे. 

     पुणे शहर,पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आणि  आजूबाजूचा परिसर,येरवडा,  वानवडी,शिवाजीनगर,पुणे स्टेशन एरिया,पर्वती,हडपसर,घोरपडी,  मार्केटयार्ड या भागातील  राहणाऱ्या नागरिकांना अन्नदानाची व इतर सेवा निरंतर चालू आहे. सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय कोठावळे यांना  त्यांचे सहकारी रवींद्र गायकवाड हे देखील अमूल्य सहकार्य करीत आहेत .

      माननीय अक्षय कोठावळे यांनी अथक प्रयत्न करून लाखो रुपयांची तजवीज करून हा दान यज्ञ सुरु ठेवला आहे. आपल्या जीवनातील वेळेचा,ओळखीचा  या कठीण प्रसंगात त्यांनी योग्य उपयोग करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

     हा उपक्रम लॉक डाउन संपेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सह्याद्री सेवा संघांचे अध्यक्ष  अक्षय कोठावळे यांनी सांगितले.

Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image